नियतीचा खेळ, रस्त्यावरुन चालताना अचानक 5 व्या मजल्यावरुन कुत्रा 3 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडला आणि….

कधी काय होईल याचा नेम नाही. अगदी 3 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत अशीच एक धक्कादायक घटना घडली. असं काही घडेल, याचा कोणीही विचार केला नव्हता. ठाण्याजवळच्या मुंब्रा परिसरात ही घटना घडली. हा सर्व घटनाक्रम कॅमऱ्यात कैद झाला आहे.

नियतीचा खेळ, रस्त्यावरुन चालताना अचानक 5 व्या मजल्यावरुन कुत्रा 3 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडला आणि....
dog falls on girlImage Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 10:36 AM

रस्त्यावरुन आईसोबत रमत-गमत चालत असताना एका 3 वर्षाच्या मुलीसोबत अत्यंत दुर्देवी घटना घडली. असं काही घडेल असा विचारच कोणाच्या मनात आला नसेल. रस्त्यावरुन चालत असताना पाचव्या मजल्यावरुन एक कुत्रा थेट 3 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडला. प्रचंड वेगात कुत्रा अंगावर पडल्याने मुलगी तिथेच कोसळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झालीय. एक अरुंद गल्लीबोळातून चालत असताना ही घटना घडली. ठाण्याजवळच्या मुब्रा परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली.

मुलगी आईसोबत चालत होती. आई दोन पावलं पुढे असताना अचानक मोठा आवाज झाला. मागे वळून पाहिलं, तर कुत्रा अंगावर पडून मुलगी जखमी झालेली. मागून येणाऱ्या महिलेने त्या मुलीला उचलून तिच्या आईच्या हातात दिलं. आई लगेच धावतपळत बेशुद्धवस्थेत असलेल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला मृत घोषित केलं.

कुत्र्याच काय झालं?

या घटनेत कुत्रा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. त्याला वेटनरी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मुंब्रा पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु झाली आहे. कुत्रा अपघाताने खाली पडला की, त्याला जाणीवपूर्वक खाली फेकण्यात आलं. पुढील तपास सुरु आहे. या घटनेत एक निष्पाप तीन वर्षाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.