पोलिसाच्या डोक्यात घातला दगड, भांडणाऱ्यांना समज देतानाचा प्रकार, पोलीस असुरक्षित तर लोकांचं काय?
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावा, यासाठी पोलीस अहोरात्र काम करत असतात. मात्र, ठाण्यातील खालापुरात भांडणाऱ्यांना समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या डोक्यात दगड घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन पोलिसांचा धाक आहे की नाही, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. खोपोली ठाण्यातील एका पोलिसानं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरच हल्ला करण्यात आलाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालापूर : देशात कायदा आणि सुव्यवस्था (law and order) अबाधित रहावा, यासाठी पोलीस (police) अहोरात्र काम करत असतात. कोणताही वाद उद्भवल्यास त्याला योग्य पद्धतीनं हाताळून कायदा मोडणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत असतात. मात्र, ठाण्यातील खालापुरात भांडणाऱ्यांना समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या डोक्यात दगड घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन पोलिसांचा धाक आहे की नाही, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. ठाण्यातील खालापुरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. धनराज सुरेश जंबगी आणि रामराज सुरेश जंबगी हे दोन्ही भांडण करत एकमेकांना शिवीगाळ करत होते. यावेळी मोठमोठ्यानं भांडण करत असल्यानं आणि वाद वाढत असल्याचं लक्षात येताच याठिकाणी असलेल्या खोपोली (Khopoli)) ठाण्यातील पोलीस सोमनाथ तांदळे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी भांडण करणाऱ्या दोघांनी तांदळे यांच्यावरच हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
खोपोली पोलीस ठाण्यात कार्यरत सोमनाथ तांदळे हे मंगळवारी न्यायालयातील एका खटल्याच्या समन्स बजावणी करण्यासाठी मुकुंदनगर, भानवज खोपोली याठिकाणी गेले होते. खोपोलीत त्या ठिकाणी धनराज सुरेश जंबगी आणि रामराज सुरेश जंबगी हे भांडण करून एकमेकांना शिवीगाळ करत होते. यावेळी दोघेही मोठं-मोठ्यानं वादही घातल होते. हा प्रकार सोमनाथ तांदळे यांच्या लक्षात आला. यावेळी वाद वाढताच तांदळे यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना धनराज सुरेश जंबगी आणि रामराज सुरेश जंबगी यांना समजावून सांगितले. मात्र, दोघेही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी तांदळे यांनी भांडण थांबवा, असं म्हटलं. मात्र, भांडण करणाऱ्या रामराज आणि धनराज यांनी पोलीस सोमनाथ तांदळे यांच्यावरच हल्ला केला. त्यांनी सोमनाथ यांच्या डोक्यात दगड (stone) आणि सिमेंटचा पत्रा मारून त्यांना जखमी केलं. तांदळे यांच्याकडील शासकीय कागदपत्रे फाडून त्यांना शिवीगाळही केली. या घटनेबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा
पोलिसांच्या डोक्यात दगड घातला जात असेल तर पोलिसांचा धाक उरलाय का, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. यासाठी आरोपींना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात. कोणताही अनुचित प्रकार घडून नये, याकडे पोलिसांकडून काटेकोरपणे लक्ष दिलं जातं. मात्र, ठाण्याच्या खोपोलीतील प्रकार धक्कादायक असून कायदा अबाधित रहावी, यासाठी कार्य करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला करण्यात आलाय. खालापुरच्या घटनेत सोमनाथ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इतर बातम्या