लाज सोडली! शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेचा भाऊच निघाला नराधम, डोंबिवलीत 8 वर्षाच्या मुलीवर….

डोंबिवलीत 8 वर्षीय मुलीवर तिच्या शिकवणी शिक्षिकेच्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लाज सोडली! शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेचा भाऊच निघाला नराधम, डोंबिवलीत 8 वर्षाच्या मुलीवर....
लाज सोडली! शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेचा भाऊच निघाला नराधम, डोंबिवलीत 8 वर्षाच्या मुलीवर....
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 7:55 PM

डोंबिवलीला खरंतर सांस्कृतिक शहर मानलं जातं. पुणे शहरानंतर डोंबिवली आणि बदलापूर शहरांना सांस्कृतिक शहर मानलं जातं. पण या सांस्कृतिक शहरांमध्ये आजच्या घडीला तळपायाची आग मस्तकात जावी अशा घटना घडत आहेत. बदलापुरात एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आता डोंबिवलीत धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना इतक्या खालच्या थराची आणि संतापजनक आहे की, अशाप्रकारची घटना घडूच कशी शकते? असा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे ही घटना डोंबिवली सारख्या शहरात घडतेय? एका अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेच्या भावानेच लैंगिक अत्याचार केला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीतील गावात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेच्या भावाने हा गंभीर गुन्हा केल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीने घरी सांगितल्यावर कुटुंबीयांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही घटना 15 जानेवारीच्या रात्री घडली. पीडित मुलगी नियमितप्रमाणे ट्युशनसाठी आरोपीच्या बहिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात ट्युशन टीचर अनुपस्थित होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने मुलीला बेडरूममध्ये नेऊन बलात्कार केला. घडलेला प्रकार मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मानपाडा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

कल्याण-डोंबिवलीत वारंवार गुन्हेगारीच्या घटना

कल्याण आणि डोंबिवली शहरांतून वारंवार गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. कल्याण-डोंबिवली शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. विशेष म्हणजे शिकवणीच्या ठिकाणीदेखील मुली आता सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. नुकतंच दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रोडवरील एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. काही अल्पवयीन विद्यार्थिनी या आपला क्लास सुटल्यानंतर घरी जात होत्या. यावेळी टेम्पोतून जाणाऱ्या तीन तरुणांची त्यांची छेड काढली होती. यावेळी मुली सात ते आठ जणी होत्या. त्यामुळे त्यांनी आरोपींचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. पण मुलींनी त्या तीनही आरोपींना चोप चोप चोपलं. विशेष म्हणजे यावेळी मुलींना तिथल्या स्थानिकांनीदेखील मदत केली होती. त्यानंतर आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. या घटनेनंतर आता डोंबिवलीत शिकवणीसाठी गेलेल्या अवघ्या 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.