Thane Student Death : वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ठाण्यातील निळकंठ वूडसमधील ओलिविया या इमारतीत ओम मिश्रा आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. ओम रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहाव्या इयत्तेत शिकतो. सध्या ओमची शालांत परीक्षा सुरु आहे. शनिवारी ओम विज्ञानचा पेपर देऊन घरी आला. घरी आल्यानंतर काही वेळानंतर वडिलांनी त्याला अभ्यास कर असे सांगितले.

Thane Student Death : वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
ठाण्यात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्याImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 11:15 PM

ठाणे : वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याचा राग येऊन दहावीच्या विद्यार्थ्या (Student)ने इमारतीच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ओम मनिष मिश्रा (15) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ माजली आहे. (A 10th standard student commits suicide out of anger after his father told him to study)

अभ्यास करायला सांगितले म्हणून आत्महत्या

ठाण्यातील निळकंठ वूडसमधील ओलिविया या इमारतीत ओम मिश्रा आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. ओम रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहाव्या इयत्तेत शिकतो. सध्या ओमची शालांत परीक्षा सुरु आहे. शनिवारी ओम विज्ञानचा पेपर देऊन घरी आला. घरी आल्यानंतर काही वेळानंतर वडिलांनी त्याला अभ्यास कर असे सांगितले. यामुळे ओमला राग आला आणि त्याने आई-वडिलांसमोरच 19 व्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

औरंगाबादमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या

अभ्यासाच्या तणावातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. वैष्णवी रमेश काकडे (22) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. वडिलांच्या नावे सुसाईड नोट लिहून वैष्णवीने आत्महत्या केली. ‘सॉरी बाबा..मी डॉक्टर होण्याचे तुमचे स्वन पूर्ण करू न शकल्याने माफ करा’ असे चिट्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली. वैष्णवी ही औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय आणि महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. (A 10th standard student commits suicide out of anger after his father told him to study)

इतर बातम्या

ठाण्यात पाण्याची टाकी साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू, दोघांची परिस्थिती गंभीर

प्रेमाचा नाही नेम, 20 दिवसांत तब्बल 8 जणांचा झाला गेम! Rajasthan मधील 8 हत्याकांडाची Murder Mystery

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.