Dog Beaten : उल्हासनगरात कुत्रीला अमानुष मारहाण, घटना मोबाईल कॅमेरात कैद, पिता-पुत्राविरोधात गुन्हा

शनिवारी रात्री स्थानिकांना ही कुत्री इमारतीजवळ निपचित पडलेली दिसल्यानं त्यांनी प्राण्यांच्या डॉक्टरांना बोलावलं असता डॉक्टरांनी कुत्रीला मोठ्या प्रमाणात मार लागल्याचं सांगितलं. त्यानंतर काही वेळातच या कुत्रीचा मृत्यू झाला. यानंतर स्थानिक प्राणीमित्र आशिष सरकार आणि रजनी ठाकूर या दोघांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या पितापुत्राविरोधात तक्रार केली.

Dog Beaten : उल्हासनगरात कुत्रीला अमानुष मारहाण, घटना मोबाईल कॅमेरात कैद, पिता-पुत्राविरोधात गुन्हा
उल्हासनगरात कुत्रीला अमानुष मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 4:53 PM

उल्हासनगर : एका कुत्री (Dog)ला अमानुष पद्धतीने मारहाण (Beaten) केल्यानं तिचा मृत्यू (Death) झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही घटना एका नागरिकाने मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित केली असून याप्रकरणी प्राणिमात्रांच्या तक्रारीवरून पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक मोतीरामानी आणि हितेश मोतीरामानी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. या कुत्रीला 6 पिल्लं असून ही पिल्लं कुत्रीच्या मृत्यूमुळे आईच्या मायेला पारखी झाली. या कुत्रीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पितापुत्रांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्र रजनी ठाकूर यांनी केली आहे.

चपला उचलून नेत असल्याने कुत्रीला मारहाण

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील ओटी सेक्शनमध्ये गुरुवारी 26 मे रोजी दीपक मोतीरामानी हे एका कुत्रीला बांबूने अमानुषपणे मारहाण करत होते. यावेळी ही कुत्री वेदनेनं अक्षरशः विव्हळत होती, मात्र तरीही ते तिला बांबूने मारत होते. यावेळी तिथल्या लोकांनी कुत्रीला का मारताय? असं विचारलं असता आमच्या चपला उचलून नेत असल्यानं तिला मारत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा शनिवारी 28 मे रोजी दीपक यांचा मुलगा हितेश याने त्याच कुत्रीला बांबूने मारहाण केली. हा प्रकार स्थानिक रहिवाशांनी मोबाईल कॅमेरात चित्रित केला.

यानंतर शनिवारी रात्री स्थानिकांना ही कुत्री इमारतीजवळ निपचित पडलेली दिसल्यानं त्यांनी प्राण्यांच्या डॉक्टरांना बोलावलं असता डॉक्टरांनी कुत्रीला मोठ्या प्रमाणात मार लागल्याचं सांगितलं. त्यानंतर काही वेळातच या कुत्रीचा मृत्यू झाला. यानंतर स्थानिक प्राणीमित्र आशिष सरकार आणि रजनी ठाकूर या दोघांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या पितापुत्राविरोधात तक्रार केली. त्यानुसार मध्यवर्ती पोलिसांनी दीपक मोतीरामानी आणि हितेश मोतीरामानी या दोघांच्या विरोधात आयपीसी 429 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी दिली. (A case has been registered against father and son for inhumane beating of a dog in Ulhasnagar)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.