Dombivali Crime : डोंबिवलीत उधारी देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, दोघेही गंभीर जखमी
डोंबिवली मानपाडा रोडवर असलेल्या शारदा मुकाआंबिका हॉटेलमध्ये काल रात्रीच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्यांनी हॉटेलात घुसून धिंगाणा घातला. यात सीसीटीव्ही कॅमेरा, टेबल खुर्च्यांची तोडफोड करत डीव्हीआरच्या वायर तोडून हॉटेलचे मालक दयांनद शेट्टी आणि एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली.
डोंबिवली : मागील बिल बाकी असल्याने पार्सल उधारीमध्ये न दिल्याने 10 ते 15 जणांच्या टोळी (Gang)ने हॉटेलमध्ये तोडफोड (Vandalism) करत हॉटेल मालक व हॉटेल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना काल रात्री डोंबिवलीत घडली आहे. मानपाडा रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. या मारहाणीत हॉटेल मालक आणि कर्मचारी दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या हॉटेलचे मालक व त्यांच्या कर्मचार्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
पार्सल देण्यास नकार दिल्याने तोडफोड आणि मारहाण
डोंबिवली मानपाडा रोडवर असलेल्या शारदा मुकाआंबिका हॉटेलमध्ये काल रात्रीच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्यांनी हॉटेलात घुसून धिंगाणा घातला. यात सीसीटीव्ही कॅमेरा, टेबल खुर्च्यांची तोडफोड करत डीव्हीआरच्या वायर तोडून हॉटेलचे मालक दयांनद शेट्टी आणि एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. याचवेळी मालकाजवळ असलेली 1 लाख रूपयांची रोकड आणि अंगठी देखील चोरी केली असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये रात्री एक ग्राहक बसला होता. बिल न भरता तो तेथून निघून गेला.
काही वेळाने हॉटेलमध्ये 10 ते 15 जण आले आणि त्यांनी त्या ग्राहकाचे नाव सांगून पार्सल मागितले. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना आधी बिल भरण्यास सांगताच संतापलेल्या या टोळीने हॉटेलमध्ये तोडफोड करत हॉटेल मालक दयानंद शेट्टी व त्याच्या कर्मचाऱ्याला देखील मारहाण केली. हॉटेल मालक दयानंद शेट्टी याच्या डोक्याला आणि अंगावर दुखापत झाली असल्याने उपचारासाठी त्यांना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (A hotel owner and an employee were beaten to death for refusing to deliver a parcel in Dombivali)