पती-पत्नीने घेतला घातक निर्णय, बंगल्याच्या गच्चीवरून खाली थेट मारली उडी

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात नंदकुमार ननावरे राहत होते. त्यांनी आज आपल्या पत्नीसह बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारली.

पती-पत्नीने घेतला घातक निर्णय, बंगल्याच्या गच्चीवरून खाली थेट मारली उडी
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 10:27 PM

ठाणे : नंदकुमार ननावरे हे एका माजी आमदाराकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. काही कारणामुळे त्यांनी स्वीय सहाय्यकाचे काम सोडले होते. नंदकुमार ननावरे हे आपल्या कुटुंबीयांसह उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहत होते. आज दुपारच्या सुमारास त्यांनी आपली पत्नी उर्मिला हिच्यासह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारली. यात दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेनंतर आशेळेपाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

माजी आमदारांकडे होते स्वीय सहाय्यक

नंदकुमार ननावरे आणि त्यांची पत्नी या दाम्पत्याने जीवन का संपवले, याचे कारण अद्याप समजले नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. नंदकुमार ननावरे हे पूर्वी दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते.

चुकीचे वृत्त पसरवू नका

गेल्या काही वर्षांपासून ते अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असल्याचे बोलले जात होते. मात्र या घटनेनंतर डॉ. बालाजी किणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ननावरे हे आपले स्वीय सहाय्यक नसल्याचे स्पष्ट केले. तसेच चुकीचे वृत्त पसरवू नये, असे आवाहन केले आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात नंदकुमार ननावरे राहत होते. त्यांनी आज आपल्या पत्नीसह बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारली. या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ननावरे दाम्पत्याने असा घातक निर्णय का घेतला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

लातूरमध्ये दोघांचा तलावात बुडून मृत्यू

लातूर : दुसऱ्या एका घटनेत, पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या मावस भावांचा तलावात पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उदगीर शहरातील सोमनाथपूर परिसरात घडली आहे. बिलाल बागवान (वय २०) आणि अतिक बागवान (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. उदगीर ग्रामीण पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून अग्निशमन पथकाच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.या घटनेने उदगीर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.