Thane: थोडक्यात मोठी रेल्वे दुर्घटना टळली! पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळावर झाड कोसळलं, तितक्यात ट्रेन धडधडत आली…

Parsik Tunnel News : पारसिक बोगड्याच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झाड कोसळलं होतं.

Thane: थोडक्यात मोठी रेल्वे दुर्घटना टळली! पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळावर झाड कोसळलं, तितक्यात ट्रेन धडधडत आली...
थोडक्यात दुर्घटना टळली...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 8:18 AM

मुंब्रा : सोमवारी रात्री थोडक्यात एक मोठा रेल्वे अपघात (railway accident) टळला आहे. मुंबईवरुन भागलपूर (Mumbai Bhagalpur Lokmanya Express) या ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडी समोर झाड कोसळलं होतं. मुंब्रा रेल्वे पारसिक बोगद्याच्या (Parsik Tunnel) ठिकाणी झाड कोसळलं. रेल्वे रुळांवर हे झाडं कोसळून एक्स्प्रेस ट्रेनचा खोळंबा झाला होता. दरम्यान, यावेळी रेल्वेचे तीन डब्बे या झाडावुरन पासही झाले होते. यानंतर तासभर ही एक्स्प्रेस ट्रेन थांबूनच होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं. मात्र यावेळी थोडक्यात मोठी दुर्घटना होता होता टळली. त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. रात्री अंधारात चालकाला रेल्वे रुळावर झाड पडल्याचा अंदाज आला नव्हता. मात्र जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यानं प्रसंगावनधान राखत तातडीने इमरजन्सी ब्रेक लावले आणि गाडी नियंत्रणात आणून थांबवली. अचानक गाडी बराच वेळ का थांबवली आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडला होता.

…थोडक्यात अनर्थ टळला!

पारसिक बोगड्याच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झाड कोसळलं होतं. नेमक्या याच वेळी भागरपूल लोकमान्य एक्स्प्रेस जात होती. यावेळी अंधारात रेल्वे रुळांवर झाड कोसळ्याचं लक्षात येताच एक्स्प्रेसच्या चालकानं प्रसंगावधान राखलं. त्यामुळे मोठं अनर्थ टळला आणि सर्व प्रवाशी बालंबाल बचावले. गाडीवर नियंत्रण आणेपर्यंत या एक्स्प्रेसचे तीन डबे झाडावरून पास झाले होते. रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक झाड कोसळल्यामुळे विस्कळीत झाली होती.

हे सुद्धा वाचा

झाड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि इतर यंत्रणांना तत्काळ घटनास्थळी तैनात करण्यात आलं. यानंतर झाड हटवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले. तासभर चाललेल्या बचावकार्यानंतर अखेर रेल्वे रुळांवर पडलेलं झाड हटवण्यात आणि त्यानंतर पुढील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. हे झाड कापून रेल्वे रुळावरुन हटवण्यात आलं. यावेळी रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचारी यांनी झाडाली अगदी चाटून ट्रेन रवाना केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.