लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या दोघांत तिसरा आला, त्याने असा केला घात की सारेच हादरले
त्याने तिच्या पार्टनरचा काटा काढायचा ठरवला. त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाच्या भरात त्याने भयानक कृत्य केले.
ठाणे : ही घटना आहे डोंबिवलीतील तो आणि ती लिव्ह इनमध्ये राहत होते. तिला नवा मित्र मिळाला. त्याला या दोघांचे संबंध खटकू लागले. त्यामुळे तो त्यांच्या मागावर होता. या दोघांचे लिव्ह इनमध्ये राहणे त्याला पसंत पडले नाही. म्हणून त्याने तिच्या पार्टनरचा काटा काढायचा ठरवला. त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाच्या भरात त्याने भयानक कृत्य केले. आता पश्चातापाशिवाय त्यांच्याकडे काही नाही. कारण जेलची हवा खावी लागणार आहे.
मारुती हांडेची हत्या
डोंबिवलीच्या कोळेगावात एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. संध्या सिंह आणि तिचा मित्र गुड्डू शेट्टी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मारुती हांडे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बॅटने बेदम मारहाण
मारुती हांडे आणि संध्या सिंह हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये डोंबिवली कोळेगाव परिसरात राहत होते. संध्याची गुड्डू शेट्टी याच्याशी मैत्री असल्याने दोघात प्रेमप्रकरण असल्याचा संशय मारुती आणि संध्यात वाद सुरू होते. याच दरम्यान गुड्डू शेट्टी घरात आला. मारुतीला बॅटने बेदम मारहाण करत त्याची राहत्या घरात हत्या केली.
डोंबिवलीमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये डोंबिवलीमध्ये आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या कोळेगावात मारुती हांडे हा संध्या सिंह या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कोळेगाव परिसरात राहत होते. याच दरम्यान संध्याची गुड्डू शेट्टी याच्याशी मैत्री झाली.
संध्या आणि मारुतीमध्ये वाद
संध्याचे गुड्डूसोबत प्रेमप्रकरण असल्याचा संशय मारुतीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू होते. याच दरम्यान शनिवारी दुपारच्या सुमारास संध्या आणि मारुती या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी गुड्डू देखील घरात उपस्थित होता. गुड्डू आणि संध्या या दोघांनी संतापाच्या भरात मारुतीला बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मारुती यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संध्या सिंह आणि तिचा मित्र गुड्डू शेट्टी यांना ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु केली आहे.