बदलापूर प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांची बंदूक घेऊन झाडली गोळी

Badlapur case : बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणारा आरोपी अक्षय शिंदे याचे वय केवळ 24 वर्षे आहे. त्याचे तीन वेळा लग्न झाले होते. मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती देखील समोर आली होती. अक्षयवर दोन मुलींवर लैंगिक छळ केल्याचा आरोप होता.

बदलापूर प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांची बंदूक घेऊन झाडली गोळी
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 7:11 PM

akshay shinde : बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक पोलीस अधिकारी ही जखमी झाले आहे. अक्षय शिंदे हा गंभीर असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. सध्या पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. तळोजा कारागृहातून पोलीस त्याला बदलापूरला घेऊन येत असताना ही घटना घडल्याचं बोललं जातं आहे.

अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वत:वर देखील गोळी झाडली. अक्षय शिंदे याने तीन राऊंड फायर केले आहेत. या घटनेत आरोपी अक्षय शिंदेचा मुत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

‘बदलापूरच्या घटनेतील आरोपीच्या आईने त्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्व केल्याचा आरोप केला होता. आरोपीने गोळी झाडली ही इतकी साधी घटना नाही. हैदराबादमध्ये आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं होतं. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी.’ अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.