शरद पवार यांना काँग्रेसने पंतप्रधान होऊ दिलं नाही? अजित पवार बघा काय म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केलाय. त्या दाव्यावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी त्यावेळची परिस्थिती नेमकी काय होती? याबाबत माहिती दिली.

शरद पवार यांना काँग्रेसने पंतप्रधान होऊ दिलं नाही? अजित पवार बघा काय म्हणाले
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 11:22 PM

ठाणे | 9 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत मोठा दावा केल्याची बातमी समोर आलीय. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीत एनडीएच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला. विशेष म्हणजे काँग्रसने शरद पवार यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच काँग्रेस आणि शरद पवार यांनी चांगल्या लोकांना संधी देण्यापासून डावललं, असाही दावा मोदींनी केल्याची बातमी समोर आलेली.

नरेंद्र मोदी यांच्या या दाव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:चं मत मांडलेलं आहे. आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नाही. एकदा राज्यातील 48 पैकी 38 खासदारांनी शरद पवार यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता. पण नरसिंह रावांना त्यावेळी इतर राज्यातील खासदारांनी पाठिंबा दिला. ते पंतप्रधान झाले. शरद पवार यांना दोन-तीन वेळा पंतप्रधान पदाची संधी आली होती. पण ती पूर्ण झाली नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणुका युतीत लढणार की नाही?

“स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका युतीने लढायचं का? याबाबत स्थानिक पातळीवर ठरवलं जाईल. सुप्रीम कोर्टात निवडणुकीचा विषय प्रलंबित आहे. निवडणुका लागल्यानंतर पक्षांची ताकद मर्यादीत असेल तिथे स्थानिक पातळीवर युतीला मुभा देवू. तीन पक्षातील एखादा पक्ष जिथं पावरफुल असेल तिकडे तो पक्ष लढेल”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“प्रत्येक नागरिकांचं संरक्षण करणं समितीची जबाबदारी आहे. कुणाला कुठलं सरंक्षण दिलं पाहिजे हे समिती ठरवत असते. केंद्रीय निेतीन गडकरींना धमकीचे फोन आलेले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. जे कुणीही प्रमुख असतात ते त्यात हस्तक्षेप करत नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.

“आम्ही राष्ट्रवादी म्हणून काम करत आहोत. आम्हाला नागालँडचा आम्हाला पाठिंबा आहे. एक सगळा परिवार एकसंघ परिवार राहावा. नवीन पिढीला काम करता यावं यासाठी कार्यक्रम आहे. कामातून कार्यकर्ता घडत असतो”, असं अजित पवार म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.