AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातून धक्कादायक फोन, शिक्षकाला केलं जिवंतपणीच मृत घोषित

55 वर्षीय व्यक्तीला जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ठाण्यातील मानपाडा येथे राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती.

ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातून धक्कादायक फोन, शिक्षकाला केलं जिवंतपणीच मृत घोषित
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 11:40 PM

ठाणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे महिलेला तीन डोस दिल्याचे उदाहरण ताजे असताना आता चक्क 55 वर्षीय व्यक्तीला जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ठाण्यातील मानपाडा येथे राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यानच्या काळात होम क्वॉरन्टाईन राहून घरीच उपचार करुन देसाई बरे झाले होते. पेशाने शिक्षक असलेल्या देसाई यांना मंगळवारी अचानकठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातून एका महिलेचा फोन आला. त्यानंतर घरच्या पत्त्याची विचारपूस या महिलेने केली.जिवंत असून मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले. (alive man is noted as dead person in thane Minicipal Corporation)

ठाणे पालिकेतील  महिलेने चंद्रशेखर देसाई हे कधी मृत झाले ? आम्हाला नोंद करायची आहे ? तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र तयार आहे, प्रश्न विचारले. या महिलेचे हे वाक्य ऐकून देसाई यांच्या पायाखालची वाळू सरकली असून मी जिवंत असल्याची त्यांनी या महिलेला सांगितले. दरम्यान चंद्रशेखर देसाई यांनी त्वरित महापालिकेत धाव घेत आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मी जिवंत असून मला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार माझ्यासोबत घडला असल्याचे त्यांनी सांगितले.

तांत्रिक कारणामुळे चुकीचा गैरसमज झाला

मृत घोषित केलेल्या व्यक्तीने याप्रकाराबाबत मत व्यक्त केले आहे.  हाच फोन जर माझ्या कुटूंबियांपैकी कोणाला केला असता तर अनर्थ झाला असता, असं देसाई यांनी म्हटलंय. त्यामुळे ठाणे महापालिकेने निदान नोंदणी व्यवस्थित करावी अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

तांत्रिक कारणामुळे चुकीचा गैरसमज झाला

दरम्यान, तांत्रिक कारणामुळे चुकीचा गैरसमज झाला आहे. कोरोना रुंग्णांची यादी पुणे आरोग्य विभागातून प्राप्त होत असल्याने अशी चूक झाली असावी. रुग्ण बाधित झाल्यानंतर बरा होईपर्यंत महापालिका पाठपुरावा करत असते. त्यानंतर कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाली आहे का अशी देखील विचारपूस करण्यात येते. मात्र अश्या स्वरूपाचा फोन गेला असल्याने पुन्हा अशी चूक होणार नाही असे प्रशासनाने सांगितले आहे.

इतर बातम्या :

पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?

ठाकरे पवारांची 22 दिवसात दुसरी भेट, राऊतांचे ‘नरेंद्रभाई’, मविआत कशाची घाई? वाचा सविस्तर

(alive man is noted as dead person in thane Minicipal Corporation)

व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.