माजी मंत्र्यांच्या सर्व खात्यांची चौकशी केली जाणार, नरेश म्हस्के यांचा महाविकास आघाडीला इशारा
माजी मंत्र्यांची म्हणजे महाविकास आघाडीतील झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी होणार असं नरेश म्हस्के म्हणाले.
ठाणे : माजी मंत्र्यांच्या सर्व खात्यांची चौकशी केली जाणार आहे. असा सूचक इशारा नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. चौकशीनंतर कुणाला जामीन मिळतो का बधा. अनेक तक्रारी आलेल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर नरेश म्हस्के यांनी हा इशारा दिला आहे. चौकशीचे निर्णय लवकरचं घेणार असंही म्हस्के म्हणाले.
कायद्याने काही मंत्र्यांच्या गैरकारभाराच्या चौकशी होणार आहेत. अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यावेळी ठिक आहे. तुमचा दबाव होता. आता तुम्हाला जामीन मिळालेला आहे. त्या चौकशांचे निर्णय येतील. मला वाटत नाही. तेव्हा कुणाला जामीन मिळतील. त्यामुळं त्या चौकशांसाठीसुद्धा तयार राहा, असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला.
जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणी जामीन मिळाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन हर हर महादेव चित्रपटात कोणता इतिहास चुकीचा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
माजी मंत्र्यांची म्हणजे महाविकास आघाडीतील झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी होणार असं नरेश म्हस्के म्हणाले. त्यामुळं गैरव्यवहार करणारे आणखी कोणते मंत्री आहेत, यावर चर्चा होऊ लागल्या आहेत.
जे कोणी गैरव्यवहार करणारे मंत्री असतील. त्यांना चौकशीला सामोर जावं लागणार. त्यानंतर कुठं काही जामीन मिळतो का, असा इशाराही नरेश म्हस्के यांनी दिला आहे. त्यामुळं मारहाण प्रकरणात जामीन मिळाला असला, तरी जितेंद्र आव्हाड यांची आता दुसऱ्या कोणत्या प्रकरणात चौकशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय आणखी गैरव्यवहार करणारे दुसरे कोणते मंत्री आहेत. हेही पाहावं लागेल.