AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Accident : अंबरनाथमध्ये रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

अंबरनाथच्या खुंटवली परिसरात राहणारे नितीन कमते हे बुधवारी रात्री डीएमसी कंपनीसमोर रस्ता ओलांडत होते. याचवेळी अॅक्टिव्हा गाडीवर आलेल्या सन्नी नागर या तरुणाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नितीन कमते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं.

Ambernath Accident : अंबरनाथमध्ये रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
मालेगावातील सटाणा रोडचा डेंजर झोन, एकाच ठिकाणी तीन दिवसात तीन अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 4:25 PM

अंबरनाथ : रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नितिन कामते (Nitin Kamate) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर सन्नी नागर असे आरोपी दुचाकी चालकाचे नाव आहे. अपघातात गंभीर झालेल्या कामते यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (An old man died after being hit by a two-wheeler while crossing the road in Ambernath)

दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथच्या खुंटवली परिसरात राहणारे नितीन कमते हे बुधवारी रात्री डीएमसी कंपनीसमोर रस्ता ओलांडत होते. याचवेळी अॅक्टिव्हा गाडीवर आलेल्या सन्नी नागर या तरुणाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नितीन कमते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी रात्री उशिरा दुचाकी चालक सन्नी नागर याच्याविरोधात बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

गडचिरोलीत स्कूल व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरात राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना ट्रक आणि बसमध्ये अपघात झाला. बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु बसमध्ये असलेले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. (An old man died after being hit by a two-wheeler while crossing the road in Ambernath)

इतर बातम्या

सोलापुरात दरोड्यासह सहा घरफोड्या करणारा दरोडेखोर अटकेत; ग्रामीण गुन्हे शाखेकडून 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pune crime | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; अत्याचारग्रस्त तरुणींने केली डीएनए टेस्टची मागणी