Ambernath Crime : अंबरनाथच्या चिखलोली धरणात अज्ञात मृतदेह आढळला, शिवाजी नगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

अंबरनाथ शहराला लागूनच चिखलोली धरण असून या धरणात एक अज्ञात मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धरणावर धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला.

Ambernath Crime : अंबरनाथच्या चिखलोली धरणात अज्ञात मृतदेह आढळला, शिवाजी नगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
अंबरनाथच्या चिखलोली धरणात अज्ञात मृतदेह आढळलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 6:20 PM

अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरणात आज एका अज्ञात इसमाचा मृतदेह (Deadbody) आढळून आला आहे. अग्निशमन दलाने हा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस (Shivajinagar Police) ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस याबाबत शोध घेत आहेत. तसेच ही हत्या आहे की आत्महत्या याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान चिखलोली परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याची गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. (An unidentified mans body was found in Chikhloli dam of Ambernath)

अंबरनाथ शहराला लागूनच चिखलोली धरण असून या धरणात एक अज्ञात मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धरणावर धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून पोलिस प्रयत्न करीत आहेत.

चिखलोली परिसरातील मोकळ्या जागेत आढळला मृतदेह

याआधी शुक्रवारीही अंबरनाथमध्ये एका अज्ञात इसमाचा गळा चिरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिखलोली परिसरात एका मोकळ्या जागेत शुक्रवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला होता. मृत इसमाचे वय 30 ते 35 दरम्यान असून तो याच परिसरात काम करणारा कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रात्रीच्या सुमारास त्याची हत्या झाल्याचा अंदाज असून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहेत. या इसमाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. अंबरनाथ पश्चिम पोलीस पुढील तपास करत आहेत. (An unidentified mans body was found in Chikhloli dam of Ambernath)

इतर बातम्या

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात इमारतीच्या डक्टमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

Pandharpur Crime : पंढरपूरमध्ये पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.