VIDEO: बापाची चप्पल मुलाच्या पायात आल्याने अक्कल येत नाही, आनंद परांजपेंचा पलटवार

ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील रंगलेला कलगीतुरा काही थांबताना दिसत नाही. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी त्यावर पलटवार केला आहे.

VIDEO: बापाची चप्पल मुलाच्या पायात आल्याने अक्कल येत नाही, आनंद परांजपेंचा पलटवार
anand paranjpe
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 6:20 PM

ठाणे: ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील रंगलेला कलगीतुरा काही थांबताना दिसत नाही. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी त्यावर पलटवार केला आहे. 2014 नंतर खारीगाव रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन बदलले असले तरी खासदार शिंदे यांचे श्रेय राष्ट्रवादी घेऊ इच्छित नाही. पण, त्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे. मराठीत एक म्हण आहे, बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही. आव्हाड हे मुलासमान प्रेम करतात; पण, मुलाच्या यशाने पोटदुखी होईल, अशी राष्ट्रवादीची भावना नाही, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदे यांना चपराक लगावली आहे.

आनंद परांजपे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला. कालच कळवा येथील खारीगवा उड्डाणपुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नरेश म्हस्के उपस्थित होते. काल डॉ. आव्हाड यांनी पुलाच्या उभारणीबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली होती. त्यानंतर लगेचच नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. वैयक्तीक टीका करु नका, असा सल्ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. मात्र, हाच सल्ला या दोघांनी पाळलेला नाही. काय करावे आणि काय करु नये, हा त्यांच्या संस्कृतीचा आणि संस्काराचा भाग आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका होत असताना त्यास प्रखर विरोध करणे, हे आमचे कर्तव्यच आहे. शनिवारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आव्हाड यांनी नरेश म्हस्के यांना नारदमुनीची उपमा दिली. पण, हीच उपमा समजण्यात म्हस्के यांची चूकच झालेली आहे. कारण, ते कलियुगातील नारद आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून भविष्यात काही चांगले घडेल, अशा प्रकारची अपेक्षा करणेच फोल आहे, असा हल्ला परांजपे यांनी चढवला.

आव्हाड काय म्हणाले ते त्यांना समजलेच नाही

सत्य युगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णू यांनी मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसिंह हे अवतार घेतले अन् धर्माची स्थापना केली. त्रेतायुगामध्ये वामन, परशुराम आणि रामाचा अवतार घेऊन धर्माची मर्यादा समजावून सांगितली. द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेऊन धर्म म्हणजे काय, भगदगितेद्वारे समजावले. त्याकाळी नारदमुनीची कायम धर्माचे रक्षण आणि धर्माच्या स्थापनेसाठी महत्वपूर्ण भूमिका घेतली होती. पण, आजच्या कलियुगामध्ये नरेश म्हस्के यांची ही भूमिका नक्कीच नाही. त्यामुळे आव्हाड काय म्हणाले ते त्यांना समजलेच नाही. म्हस्के यांनी असे म्हटले आहे की, महापालिकेमध्ये महाविकास आघाडी कुठे दिसतेय? महापौर म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना 131 नगरसेवकांचे पालकत्व आपसूक मिळाले. त्यामुळे कोणत्याही विकासकामामध्ये पक्षीय राजकारण आणणे हे महापौरपदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. लसीकरण, मोबाईल बस देणे असो, नगरसेवकांना विकास निधी देणे असो, किंबहुना ऑनलाईन महासभेत नगरसेवकांचे आवाज म्यूट करणे असो, अशा प्रकारचे पक्षीय राजकारणदेखील महापौरांनी केले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

घोटाळ्यावर बोला

महापौरांनी पुलाचा इतिहास सांगितला. पण, महापौरांनी याही प्रश्नाचे स्पष्टीकरण द्यावे की, भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, गटनेते मनोहर डुंबरे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. त्याची चौकशी सुरु झाली आहे. केंद्रीय नगरसचिवांनी माहिती मागवणारे पत्रही पाठविले आहे. महापौरांनी त्याचीही माहिती जाहीर करावी, असे आव्हानच परांजपे यांनी दिले.

ती भावना राष्ट्रवादीची नाही

खासदार शिंदे यांनीही टीकात्मक भाषा वापरली. आव्हाड यांच्याकडून माहिती देताना पुलाच्या बांधणीचा क्रम चुकला असेल. पण, त्यामुळे या पुलाच्या उभारणीतील आव्हाड यांचे योगदान कमी होत नाही. पूल मंजूर झाला त्यावेळी रेल्वे रुळांवरील अंतर हे 63 मीटरचे होते. रोडची रुंदी 7.5 मीटर आणि 1.75 मीटरची होती. रेल्वे रुळांवरील बांधकाम रेल्वेकडून तर उर्वरित बांधकााम हे पालिकेकडून होणे होते. त्याचे नियोजन बदलले असले तरी खा. शिंदे यांचे श्रेय राष्ट्रवादी घेऊ इच्छित नाही. पण, त्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे. मराठीत एक म्हण आहे, बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही. आव्हाड हे मुलासमान प्रेम करतात, पण, मुलाच्या यशाने पोटदुखी होईल, अशी राष्ट्रवादीची भावना नाही, असं ते म्हणाले.

पुलांची टाईमलाईन जाहीर करा

दिवा उड्डाणपूल, मोठागाव ते माणकोली, कल्याण टर्मिनस, मंलंगगडावरील फर्निक्युलर प्रकल्प, वाय जंक्शन येथील पुलाची टाईमलाईन जाहीर करावी. पण, विकासाचे पर्व 2014 नंतरच सुरु झाले अन् विकास नावाचे बाळ हे 2014 लाच जन्माला आले अन् हे बाळ आता 7 वर्षांचे झाले, असा त्यांचा समज आहे. विकास हा काल, आज होत आहे, उद्याही होणार आहे. त्याबाबत राष्ट्रवादी सकारात्मक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: एसटी डेपोचे भूखंड लाटण्यासाठीच संपावर तोडगा नाही; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

भारतीय लष्कराला ‘संरक्षण दल’ न म्हणता ‘सशस्त्र सैन्य दल’ म्हणा; निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचं आवाहन

Exclusive | ‘सेटवर अपशब्द वापरले, टोमणे मारले, मी मी माझं माझं!’ सहकलाकारांचे किरण मानेंवर गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.