धक्कादायक ! ठाणे महापालिका ग्लोबल कोविड सेंटरमधील 46 डॉक्टरांना कमी करणार?

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मनुष्यबळ कमी पडू लागल्यानंतर ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये बीयूएमएस डॉक्टरांना तैनात करण्यात आले होते (Ashraf Shanu pathan said Thane Municipal Corporation reducing 46 doctors at Global Covid Center)

धक्कादायक ! ठाणे महापालिका ग्लोबल कोविड सेंटरमधील 46 डॉक्टरांना कमी करणार?
अश्रफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार केला असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधून या डॉक्टरांवरील अन्याय दूर करण्याची विनंती केली आहे
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 7:32 PM

ठाणे (प्रतिनिधी) : “कोरोनाचा कहर माजलेला असताना जीवावर उदार होऊन सेवा बजावणार्‍या 46 डॉक्टरांना अचानक कमी करण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला आहे. त्यापैकी 38 डॉक्टरांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने डॉक्टरांना कामावरुन कमी करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही, गरज सरो आणि वैद्य मरो, ही ठामपाची निती आहे. या सर्व डॉक्टरांना सेवेत कायम करुन घ्यावे”, अशी मागणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार केला असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधून या डॉक्टरांवरील अन्याय दूर करण्याची विनंती केली आहे (Ashraf Shanu pathan said Thane Municipal Corporation reducing 46 doctors at Global Covid Center).

‘अन्याय सहन करणार नाही’

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मनुष्यबळ कमी पडू लागल्यानंतर ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये बीयूएमएस डॉक्टरांना तैनात करण्यात आले होते. सुमारे 60 हजारांपासून सव्वा लाखांपर्यंतची वेतनश्रेणी पालिकेकडून देण्यात येत होती. अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये या डॉक्टर्संनी काम केले होते. त्यामध्ये अनेक डॉक्टरांना तर कोरोनाचीही लागण झाली होती. मात्र, रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर या डॉक्टरांना कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. या डॉक्टरांनी आज शानू पठाण यांची भेट घेतली. त्यावेळी पठाण यांनी हा अन्याय सहन करणार नसल्याचे सांगितले.

‘ज्यावेळी गरज होती त्यावेळी डॉक्टरांचा वापर करुन घेतला’

शानू पठाण यांनी सांगितले, ज्यावेळी ठाणे पालिकेला गरज होती. त्यावेळी या डॉक्टरांचा वापर करुन घेतला. आता त्यांना वार्‍यावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. बीयूएमससह ज्या डॉक्टरांनी कोविड काळात ठाणेकर नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस केला. त्यांना अशा पद्धतीने वार्‍यावर सोडणे म्हणजे उपकाराची परतफेड अपकाराने करण्यासारखेच आहे. त्यामुळे अशा सर्व डॉक्टरांना ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करुन घ्यावे. कौसा येथील नवीन रुग्णालयात त्यांची नियुक्ती करावी, अन्यथा पालिकेच्या गेटवरच आम्ही आंदोलनाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला (Ashraf Shanu pathan said Thane Municipal Corporation reducing 46 doctors at Global Covid Center).

हेही वाचा : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात दोन महिने मासेमारीसाठी बंदी, मंत्री अस्लम शेख यांची घोषणा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.