Badlapur Case : पुरावा नष्ट करण्याचा तर प्रयत्न तर नाही ना, विजय वडेट्टीवार यांची शंका
अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांकडून बंदूक हिसकावून त्याने तीन राऊंड फायर केले होते. पोलीस देखील यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे.
Akshay shinde suicide : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारात त्याच शाळेत काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होता. अक्षय शिंदे असं त्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो तळोजा कारागृहात असताना त्याला बदलापूरला आणत असताना आरोपीने अधिकाऱ्यांवर देखील गोळी झाडली अशी देखील माहिती आहे. त्याने तीन गोळा फायर केल्याची माहिती आहे. आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची देखील माहिती आहे. बदलापूरातील या घटनेवर बदलापुरात बंद पाळण्यात आला होता.
बदलापूर प्रकरणात आरोपी पकडण्यात उशीर केला. संस्थेतील पदाधिकारी जे आरोपी आहेत ते देखील अजून फरार आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएस पर्यंत भाजपच्या मोठ्या नेत्यापर्यंत पोहोचलेले आहे.त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे. गोळी पोलिसांनी झाडली का अशीही चर्चा आहे. पोलिसांच्या चौकशीचा हा भाग आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि वास्तविकता लोकांसमोर याची अशी माझी मागणी आहे.