Badlapur Rain Update : बदलापूर-कल्याणमधील सध्याची स्थिती काय? उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली का?

Badlapur Rain Update : बदलापूर-कल्याण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बदलापूर-कल्याणमधील सध्याची स्थिती काय आहे? कुठे पाणी साचलय? प्रशासनाने काय पावल उचलली आहेत, जाणून घ्या.

Badlapur Rain Update : बदलापूर-कल्याणमधील सध्याची स्थिती काय? उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली का?
Badlapur rain update
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 2:48 PM

आज महाराष्ट्रातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. खासकरुन पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, बदलापूर, कल्याण-डोंबिवली या भागात मुसळधारवृष्टी सुरु आहे. बदलापूरमध्ये पुराची भीती वर्तवण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली आणि बदलापूरमध्ये कुठे काय स्थिती आहे? जाणून घेऊया. बदलापुरमधून उल्हास नदी वाहते. दररोज लाखो लोक कल्याण-बदलापूर इथून नोकरीसाठी मुंबईत येतात. काल रात्रीपासून पाऊस कोसळतोय. पण सकाळपासून पावसाचा जोर वाढला आरहे.

कल्याण

– कल्याण शिवाजीनगर परिसर झाला जलमय आहे

– वालधुनी नदी लगत असलेल्या शिवाजीनगर अशोकनगर सह इतर परिसरातील घरात कमरे इतके पाणी.

– घरात राहणारे नागरिक घरातल्या वस्तू सोडून रस्त्यावर उभे.

बदलापूर

– बदलापुरात एनडीआरएफची टीम दाखल

– उल्हास नदीला पूर आल्याने एनडीआरएफची टीम बदलापुरात

– आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास होणार एनडीआरएफची मदत.

– बदलापूर जवळील भारत कॉलेज जवळील रस्ता पाण्याखाली.

– उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूर मधील सखल भागात पाणी जमा होऊ लागले आहे. बदलापूर मधील भारत कॉलेज परिसरात गुडघाभर पाणी जमा झाले असून तेथील लोकांना एक ते दीड फूट पाण्यातून जावे लागत आहे.

– बदलापुरात उल्हास उल्हास नदीला आला पूर.

– बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला.

– धोक्याची पातळी 17.50 मीटर, तर नदीची सध्याची पातळी 18.20 मीटर.

– उल्हास नदीकाठचा पेट्रोल पंपही पाण्यात बुडाला.

– ठाण्याहून एनडीआरएफची 31 जणांची टीम सुद्धा बदलापूरकडे रवाना झाली आहे.

– खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर शहराकडून बदलापूर गाव आणि ग्रामीण भागाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे.

– तर सखल भागातल्या नागरिकांना सोनिवली इथल्या बीएसयूपी प्रकल्पात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलं आहे.

कल्याण

– कल्याण नगर मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी

– पाण्यात मुलांचे जीव धोक्यात घालून शाळेतील गाडीचा प्रवास

– भर पाण्यात बस बंद पडल्याने नागरिकांनी धक्का मारत विद्यार्थ्यांना काढले सुरक्षित बाहेर.

– कल्याण टिटवाळाला जाणारा मार्ग झाला जलमय.

– कल्याण शहाड दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता झाला बंद.

– एकीकडे कल्याण नगर मार्ग बंद झाला. कल्याण टिटवाळा मार्गावरील शहाड मोने रस्त्यावरती पाणी साचल्याची घटना.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.