बदलापूर अत्याचार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक

बदलापूर अत्याचार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते. अखेर दीड महिन्यांनी त्यांना अटक करण्यात आली आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक
शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 10:18 PM

मयुरेश जाधव, Tv9 प्रतिनिधी, बदलापूर : बदलापूर चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अत्याचार प्रकरण तापल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते. पण या दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. बदलापूरच्या शाळेत 12 आणि 13 ऑगस्टला दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर बदलापूरच्या नागरिकांनी घटनेच्या विरोधात रोष व्यक्त करत रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारला घ्यावी लागली होती. या प्रकरणातील सहआरोपी संबंधित शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे फरार होते. अखेर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर नंतर विरोधकांनी या दोन्ही आरोपींवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. हे दोन्ही आरोपी फरार असल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. अखेर दीड महिन्यांनी या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींना तपास करणाऱ्या पोलिसांच्या एसआयटी टीमने ताब्यात घेतलं आहे. हे दोन्ही आरोपी शाळेचे संस्थाचालक आणि सचिव आहेत.

आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी केला होता अर्ज

संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर घटनेनंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. या दोन्ही आरोपींचा शोध एसआयटी, ठाणे क्राईम आणि भिवंडी गुन्हे शाखेचं पथक घेत होतं. पण ते सापडत नव्हते. दुसरीकडे या दोन्ही आरोपींच्या बाजूने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यांनी उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण उच्च न्यायालयानेदेखील त्यांची मागणी केली नाही. या दरम्यान, त्यांना अखेर पोलिसांनी अटक केली. त्यांची आता चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसांकडून त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “या सगळ्या प्रकरणात आरोपी का पकडले जात नाहीत? अशी भूमिका वारंवार आपण मांडली. हे दोन्ही आरोपी पकडले गेले आहेत. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, या प्रकरणाच्या तपासाला यश येईल. या प्रकरणात एक याचिका करण्यात आली आहे त्यामध्ये मानसी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे अनेक गोष्टी नमूद करण्यात आले आहेत. या संदर्भातीलही काही खुलासे पुढे येतील, अशी अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.