Bangladeshi Muslim : ‘भाईचारा करणाऱ्यांनी….’, बांग्लादेशी मुस्लिमांविरोधात भिवंडीमध्ये लागले बॅनर, काय लिहिलय?

Bangladeshi Muslim : भिवंडी हा संवेदनशील भाग आहे. भिवंडीमधल्या एका गावात बॅनर लागले आहेत. बांग्लादेश आणि रोहिंग्या मुस्लिमांविरोधात हे बॅनर आहेत. गावकऱ्यांनी या बॅनरच्या माध्यमातून इशारा दिला आहे.

Bangladeshi Muslim : 'भाईचारा करणाऱ्यांनी....', बांग्लादेशी मुस्लिमांविरोधात भिवंडीमध्ये लागले बॅनर, काय लिहिलय?
बांग्लादेशमध्ये आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 11:21 AM

सध्या बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरता आहे. अंतरिम सरकार स्थापन झालं असलं तरी बांग्लादेशमध्ये अजूनही हिंसक कारवाया सुरु आहेत. बांग्लादेशात लष्करही हतबल स्थितीमध्ये आहे. बांग्लादेशात हिंदुंवर हल्ले होत आहेत. त्यांची घर, दुकानांना लक्ष्य केल जातय. मागच्या आठवड्यात बांग्लादेशात स्थिती हाताबाहेर गेली. त्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांना देश सोडावा लागला. बांग्लादेशात निर्माण झालेल्या या अराजकतेचा सीमेवर परिणाम होणं स्वाभाविक आहे. बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे BSF हाय अलर्टवर आहे.

संभाव्य घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीच्या कोन गावातील ग्रामस्थ बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक झाले आहेत. बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना गावात राहण्यास आणि व्यापार करण्यास सक्त मनाई असल्याचे बॅनर गावात लागले आहेत. आपला गाव आपली जबाबदारी, अशी लोक गावात कुठेही आढल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे बॅनरच्या माध्यमातून गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. कोनगाव ग्रामस्थांकडून गावात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरचे स्टेटस व्हॉट्सअप डीपी वर ठेवत जनजागृती करण्यात आली आहे.

नेमका काय लिहिला आहे मजकूर

“रोहिग्या मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना गावात राहण्यास आणि व्यापार करण्यास सक्त मनाई आहे. अशी लोक गावात कुठेही आढल्यास पोलिसांना संपर्क करावा. भाईचारा (बंधु-बधुता) करणाऱ्या लोकांनी आपला ज्ञान आपल्या जवळच ठेवावे. आपला गाव आपली जबाबदारी”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.