युट्युब चॅनेलद्वारे भोंदूगिरीचा प्रसार, नरबळीच्या तयारीत असलेल्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

या झडतीमध्ये महागडे लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स, ड्रोन कॅमेरे, नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे, एक Ghost Detector मशिन, पैसे मोजण्याचे मशिन, प्राण्यांचे दात, सापाची कातडी, होम हवनचे साहित्य, त्रिशुल, चिमटा व इतर तंत्रविद्येची पुस्तकं असा अंदाजे 6,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

युट्युब चॅनेलद्वारे भोंदूगिरीचा प्रसार, नरबळीच्या तयारीत असलेल्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
नरबळीच्या तयारीत असलेल्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्याImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 8:28 PM

ठाणे : युट्युब चॅनेलचा वापर करून सर्वसामान्य जनतेला जादुटोणा (Witchcraft), काळी जादू करुन भूतप्रेत उतरवतो असे सांगून भोंदूगिरी करुन लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा (Bhondubaba)चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भोंदूबाबासह दोघांना ठाण्यातील चितळसर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा भोंदूबाबा लहान मुलांचे लैंगिक शोषणही करत होता. कुलदिप प्रदिप निकम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर किशोर देवीदास नवले आणि स्नेहा नाथा शिंदे अशी भोंदूबाबाच्या अन्य सहकाऱ्यांची नावे आहेत. (Bhondubaba was arrested by the police for witchcraft in Thane)

भोंदूबाबाच्या घरातून साडे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

भोंदूबाबा कुलदिप प्रदिप निकम हा ठाण्यातील ओसवाल पार्क येथे राहतो. आरोपीने दत्त प्रबोधिनी नावाची संस्था व पॅरानॉर्मल रेस्क्युअर सोसायटी नावाचे युट्युब चॅनल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून त्याने भूतप्रेत यांचा शोध घेऊन स्वतः तंत्रमंत्राद्वारे त्यातून मुक्ती मिळवून देतो असा प्रचार व प्रसार करून लोकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चौकशी दरम्यान पोलीस पथकाने आरोपी कुलदीप निकम याच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये महागडे लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स, ड्रोन कॅमेरे, नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे, एक Ghost Detector मशिन, पैसे मोजण्याचे मशिन, प्राण्यांचे दात, सापाची कातडी, होम हवनचे साहित्य, त्रिशुल, चिमटा व इतर तंत्रविद्येची पुस्तकं असा अंदाजे 6,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

भोंदूबाबाच्या सहकाऱ्याच्या घरावरही छापा

भोंदूबाबा याचा सहकारी आणि लहान मुलाचे लैंगिक शोषण प्रकरणी अटकेतील आरोपी किशोर देवीदास नवले याच्या बदलापूर येथील घराची झडती घेण्यात आली. यावेळी दोन वाघाचे कातडे, हॅलोजन लाईट व इतर वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत. तर आरोपी कुलदिप प्रदिप निकम याच्या कल्याण येथील ऑफिसची झडती घेतली असता त्यात लॅपटॉप, हार्ड डिस्क, कावळ्याचे पंख, काळ्या बाहुल्या, रुद्राक्षाच्या माळा, हवनकुंडाचे साहित्य, सफेद कवड्या, पियामिड्स असे जादूटाणा करण्याकरीता वापरात असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Bhondubaba was arrested by the police for witchcraft in Thane)

इतर बातम्या

Kalyan Crime : उत्तर प्रदेशमधून गावठी कट्टा घेऊन आला अन् कल्याण पोलिसांच्या तावडीत सापडला

Kushinagar: चार लेकरं तर गेलीच पण टॉफीवर बसलेल्या माशाही मेल्या, शेवटी मुक्या जीवानं आरोपी शोधलेच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.