आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं भाजप आणि शिवसेनेतील घमासान पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही 2023मध्ये सत्तेत येऊ असं विधान केलं.

आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 6:21 PM

संदेश शिर्के, कल्याण: महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं भाजप (bjp) आणि शिवसेनेतील (shivsena) घमासान पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही 2023मध्ये सत्तेत येऊ असं विधान केलं. ठाकरे यांच्या या विधानाचा भाजप नेते, आमदार रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी समाचार घेतला आहे. 2024ला सत्तेत येऊ असं आदित्य ठाकरे यांनी झोपेतून उठल्यासारखं विधान केलं आहे. मला वाटतं आदित्य यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या स्मार्ट सिटीच्या कामाचे आदित्य यांनी उद्घाटन केलं, त्याच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला त्यांचे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मंत्र्याने विरोध केला होता, अशी टीका रवींद चव्हाण यांनी केली आहे. स्मार्ट सिटी ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आदित्य यांनी किमान मोदींचा उल्लेख करायला हवा होता, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल कल्याण-डोंबिवलीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले. डोंबिवलीत काँक्रिट रस्त्याच्या कार्यक्रमावेळी आदित्य ठाकरे यांनी 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल, असं सांगत शिवसेनेचे 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचे सूचक विधान केलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी टीका केली. आदित्य यांना 2024मध्ये सत्तेत येण्याची स्वप्न पडायला लागली आहेत. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे किंवा त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली होती.

त्यांचंच मानसिक संतुलन बिघडलंय

चव्हाण यांच्या या विधानामुळे चांगलंच वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून आमदार चव्हाण यांना प्रत्युत्तर देण्यात आला आहे. शिवसेनेकडून कल्याण-डोंबिवलीत होत असलेली विकासकामे पाहून भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे बघून काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडल्याने अशी वक्तव्य करत आहेत. चव्हाण यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांनी जर विकासकामे केली असती तर त्यांना हे दिवस बघावे लागले नसते, असा टोला युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या:

केडीएमसीच्या प्रभाग रचनेचा वाद पेटला, भाजपचा कोर्टात जाण्याचा इशारा तर गाव समितीचा बहिष्काराचा इशारा

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात

Dombivli Murder | सोफासेटमधील मृतदेहाचे गूढ उकलण्याच्या मार्गावर, संशयित आरोपी विवाहितेचा मित्र?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.