शिक्षणात कल्याण पॅटर्नची ओळख, कल्याणदेखील शिक्षणाची पंढरी होणार, भाजप खासदाराचा दावा

कल्याणदेखील शिक्षणाची पंढरी होणार असून कल्याण पॅटर्नची चर्चा होणार, असे प्रतिपादन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे (BJP MP Kapil Patil says kalyan will be best city for education in Maharashtra)

शिक्षणात कल्याण पॅटर्नची ओळख, कल्याणदेखील शिक्षणाची पंढरी होणार, भाजप खासदाराचा दावा
भाजप खासदार कपिल पाटील
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 7:36 PM

कल्याण (ठाणे) : कल्याणची ओळख ऐतिहासिक आहे. मात्र आता माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे लवकरच कल्याणदेखील शिक्षणाची पंढरी होणार असून कल्याण पॅटर्न निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे. माजी आमदार आणि भाजपा भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांनी 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट आणि सीईटी प्रवेश परीक्षा ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या उपक्रमाचे उद्घाटन खासदार कपिल पाटील यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते (BJP MP Kapil Patil says kalyan will be best city for education in Maharashtra).

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी या उपक्रमाची उपयुक्तता सांगून प्रवेश परीक्षेच्या सरावासोबतच विद्यार्थ्यांना मिळणारे मार्क्स, त्याने केलेल्या चुका त्याची कारणे लगेच दिसणार असल्याचे सांगितले (BJP MP Kapil Patil says kalyan will be best city for education in Maharashtra).

नरेंद्र पवार यांचे मनोगत

या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाबाबत माहिती दिली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध कॉलेज, क्लासमधील तसेच कल्याणमध्ये राहणारे आणि इतरत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी कोणतेही शुल्क न देता मोफत या टेस्ट सिरीजचा लाभ घेतील, असं नरेंद्र पवार म्हणाले. तसेच या सिरीजमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकरणांवर आधारित टेस्ट उपलब्ध होणार आहे. विविध विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शनही लाभणार असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांनी www.narendrapawar.com या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री अकुल तर आभार प्रदर्शन अनंत किनगे यांनी केले. या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख महेश सावंत, शिक्षण क्रांती संघटनेचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष गजानन पाटील, ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष शेखर कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती

कल्याणमधील अचिवर्स महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, आचिवर्स शाळा व महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ महेश भिवंडीकर, कोषाध्यक्ष गौरांग भिवंडीकर, के एम अग्रवाल कॉलेजचे कोषाध्यक्ष दिनेश सोमाणी, समाजसेवक राजू गवळी स्थानिक नगरसेवक सचिन खेमा, महिला आघाडी प्रदेश सचिव प्रिया शर्मा तसेच ज्योतिताई भोईर, नवनाथ पाटील , नम्रता चव्हाण, सदा कोकणे, कल्पना पिल्ले, मदनभाई शंकलेशा, उमेश पिसाळ, रेणू ठाकूर, विशाल शेलार आदी उपस्थित होते.

हेही  वाचा : एक पूल, दोन लेन आणि तीन दावेदार, कल्याणमध्ये शिवसेना-भाजप आणि मनसेत रंगली श्रेयवादाची लढाई

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.