Video : वडापाव बिलाच्या व्हिडीओनं धावाधाव, भाजप कार्यकर्त्यांकडून वादावर पडदा; जितेंद्र आव्हाड यांचंही टीकास्त्र

गजानन वडापावच्या मालकांनी यांनतर स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप कार्यकर्ते भुजबळ यांनी बील दिल्याचं त्यांनी सांगितलं. गैरसमज करुन घेऊ, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

Video : वडापाव बिलाच्या व्हिडीओनं धावाधाव, भाजप कार्यकर्त्यांकडून वादावर पडदा; जितेंद्र आव्हाड यांचंही टीकास्त्र
भाजप नेत्यांनी खालेलल्या वडापावच्या बिलाच्या वादावर पडदा
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 8:35 AM

ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकल सेवेतील ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil), भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांनी दिवा ते ठाणे लोकल प्रवास केला. यानंतर भूक लागल्यानं ठाणे (Thane) स्टेशन बाहेरील गजानन वडापाव सेंटरमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वडापाव, भजी खालले. मात्र, या वडापावचे बील न भरताच निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. सोशल मीडियावरुन देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. गजानन हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी बील न भरल्याचा दावा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित हॉटेलकडे धाव घेत बील जमा केलं. बील जमा झाल्यानंतर गजानन हॉटेलच्या मालकांनी या वादावर पडदा टाकला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फुकट वडापाव खाणाऱ्यांवर टीका केली.

पाहा व्हिडीओ

नेत्यांनी मारला ताव…

ठाण्यात मंत्री आणि खासदारांनी वडापाव आणि भजींवरती मारला ताव. ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याकडे आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला आणि त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर वडा पाव वर ताव मारलाय.नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण ताव मारला. यानंतर, बील न देताच नेते कार्यकर्ते निघून गेले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा बील न भरल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाल आणि त्यानंतर उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील याची दखल घेत हॉटेलमध्ये जाऊन तात्काळ बील भरले.

वडापाववरून भाजप मंत्र्यांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची टीका

ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडापावच्या दुकानात  डापाव आणि अनेक भजी प्लेट खाल्यानंतर भाजप नेते आणि  कार्यकर्ते बिल न देताच निघून गेल्याची माहिती समोर आली. त्या बिलाचे पैसे कोण देणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण या घटनेचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी वडापावचे पैसे भरले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. जितेंद्र आव्हाड उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी फुकट वडापाव खाणाऱ्यांची तुमचं शहर सांभाळण्याची औकात नाही, अशी टीका भाजप मंत्र्यांची नावं न घेता केली.

हॉटेलच्या मालकांचं स्पष्टीकरण

गजानन वडापावच्या मालकांनी यांनतर स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप कार्यकर्ते भुजबळ यांनी बील दिल्याचं त्यांनी सांगितलं. गैरसमज करुन घेऊ, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

इतर बातम्या :

Video : मंत्री, खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांचा 200 वडापाववर ताव, पण, बील न देताच चले जाव? नेमकं प्रकरण काय?

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमापूर्वीचं कार्यकर्त्यांमध्ये राडा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.