गुढीपाडवा आणि स्वागत यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, ठाण्यातले पर्यायी मार्ग पाहा
ठाण्यात नौपाडा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत श्री कौपीनेश्वा मांस्कृतिक न्यास नववर्ष स्वागतयात्रा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त भाविकांची गर्दी होणार असल्याने मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होवू नये, वाहतूक सुरक्षित आणि सुनिश्चित होण्यासाठी बदल केले आहेत.
गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागताच्या निमित्ताने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे, डोंबिवलीत वाहतूक बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे. मंगळवार, 9 एप्रिलला सकाळच्या सत्रात जागोजागी हे वाहतूक बदल करण्यात आले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. नौपाडा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत श्री कौपीनेश्वा मांस्कृतिक न्यास नववर्ष स्वागतयात्रा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त भाविकांची गर्दी होणार असल्याने मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होवू नये, वाहतूक सुरक्षित आणि सुनिश्चित होण्यासाठी बदल केले आहेत.
पर्याची मार्ग कोणती?
डॉ मुस चौकाकडून हॉटेल साई कृपाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. मुस चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने जांभळी नाका, चिंतामणी चौकमार्गे जातील. अल्मेडा आणि वंदना टी पॉइंटकडून गजानन महाराज गौकमार्गे राम मारुती रोडने गोखले रोडकडे नाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना अल्मेडा चौक येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने खोपटकडून अल्मेडा चौकमार्गे ठाणे स्टेशनकडे जाणारी वाहने खोपट येथून चरई कट टेभी नाका मार्गे जातील.
गोखले रोडकडून डून राम राम मारुती रोडने पु. ना. गाडगीळ चौकाकडे जाण्याच्या सर्व वाहनांना गोखले रोड येथे प्रवेश बंद. वाहनांना गोखले रोड येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने तीन हात नाका गडकरी सर्कल येथे वाहनांना टॉवर नाका येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने टेंभी नाकानार्गे पुढे जातील. तीन हात नाक्याकडून हरिनिवास मल्हारमार्गे ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व परिवहन बसेसना तीन हात नाका येथे प्रवेश बंद केला आहे. या बसेस नितीन कंपनी, टी. एम. सी. सर्कल, अल्मेडा सिग्नल येवून डावे वळण घेऊन खोष्ट टेंभी नाकामार्गे जातील.
खोपटकडून अल्मेडा, पु. ना. गाडगीळमार्गे ठाणे स्टेशनकडे जाणारी सर्व वाहने, एसटी बसेसना अल्मेडा चौक येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने खोपटकडून डॉ.बाबासाहेब रोड मार्गे तसेच आत्मेडा टी. एम. सी सर्कल, नितिन कंपनीमार्गे आगमनमार्ग गोखले रोडने
सर्व वाहनांना हरिनिवास सर्कल येथे प्रवेश बंद केला आहे. ही वाहने हरिनिवास, तीन पेट्रोल पंपकडून वंदना, अल्मेडा चौका येथून खोपट, डॉ. आवारराहेब आंबेडकर रोडमार्गे जातील.
डोंबिवलीतही वाहतुकीत बदल
दरम्यान, डोंबिवलीमध्ये श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व पांच्या वतीने स्वागतयात्रा भागशाळा मैदान, डोबिवली पश्चिम येथून सुरू होऊन कोपर पूलमार्गे शिव मंदिर रोड-चार रस्ता, बाजीप्रभू चौक फडके रोड, डोंबिवली पूर्व जाणार आहे. तर या भागातही वाहतूक बदल करण्यात आले आहेत.