ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचललं असं पाऊल, म्हणाले…

CM Eknath Shinde On Thane Hospital Death Case : ठाण्यातील हॉस्पिटमध्ये एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या बातमीनंतर प्रशासन देखील खळबळून जागं झालं आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचललं असं पाऊल, म्हणाले...
ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून झालं जागं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणाले की...
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 6:05 PM

ठाणे| 13 ऑगस्ट 2023 :  ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. याच रुग्णालयात गेल्या दोन दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नेमकं काय झालं अशी जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे. 18 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 13 रुग्ण हे आयसीयूत होते. तर पाच रुग्ण हे जनरल वॉर्डमधील असल्याची माहिती समोर येत आहे. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण दगावल्याने राजकीय पटलावरही पडसाद उमटले आहेत. सरकार विरोधी पक्षातील नेत्यांनी रुग्णालयात जाऊन या घटनेची चौकशी केली. तसेच सरकारला या प्रकरणी धारेवर धरलं आहे. असं असताना ठाणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय पाऊल उचलतात याकडे लक्ष लागून होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रसारमाध्यमांसमोर आले आणि याप्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“मी या प्रकरणाची सकाळीच माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. दीपक केसरकरही त्या ठिकाणी पोहोचले असतील. आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने संपर्कात होते. वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेले रुग्ण आहेत. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. जो अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.झालेली दुर्घटना दुर्देवी आहे आणि त्यावर तातडीने निर्णय घेतलेला आहे.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आले होते. काही खासगी रुग्णालयातूनही आले होते. गंभीर स्थितीत त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्व बाबी त्यांनी माझ्या कानावर घातल्या आहेत. तरीसुद्धा झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याची सखोल चौकशी होईल.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

ठाण्यात राजकारण तापलं!

एका दिवसात इतक्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मनसे, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्यंत अस्वस्थ कंडिशनमध्ये रुग्ण रुग्णालयात येत असतात. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका डॉक्टराने दिली.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.