Thane : ठाणे महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा कार्यक्रमाची सुरूवात, लोकशाही बळकट करण्याचा निर्धार
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे. तसेच ज्या युवकांचे नाव मतदान यादीत समाविष्ट नाही त्यांनी तात्काळ आपले नाव नोंद करून लोकशाही बळकट करण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे असेही आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात 26 जानेवारी, 2022 पासून लोकशाही पंधरवडा कार्यक्रम सुरू झाला असून या निमित्ताने लोकशाही(Democracy) बळकट करण्याचा निर्धार पालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी केला आहे. राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून नागरिकांनी निवडणूक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांनी या निमित्ताने केले. महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात आज लोकशाही पंधरवडा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ उ. शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, परिवहन समिती सभापती विलास जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका पूजा करसुळे, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (Commencement of Democracy Fortnight program in Thane Municipal Corporation area)
यानिमित्ताने नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार
26 जानेवारी, 2022 ते 10 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने पालिका क्षेत्रात विविध प्रसार माध्यमांच्याद्वारे लोकशाही, निवडणूक व सुशासन याविषयी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेत वेळोवेळी घटना दुरुस्ती करून लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे. तसेच ज्या युवकांचे नाव मतदान यादीत समाविष्ट नाही त्यांनी तात्काळ आपले नाव नोंद करून लोकशाही बळकट करण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे असेही आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.
प्रजासत्ताक कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेच्या पूजनासाठी आणलेल्या प्रतिमेचे पूजन न करता ती प्रतिमा हिसकावून सुरक्षा रक्षक आणि इमारतीतील राशिवाशांसोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेस कापूर बावडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. ठाण्यातील कोलशेत भागातील लोढा हमारा या सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. हुज्जत घालणाऱ्या महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाकडून मोबाईल हिसकावून सुरक्षा रक्षकांना मारहाण करत महिला दिसत आहे. तसेच चित्रीकरण करणारे सुरक्षा रक्षक यांचे मोबाईल तोडण्यात आले. सदर महिला मानसिक तणावात असल्याचे कळते. या आदि देखील या महिलेवर कापूर बावडी पोलिसात तक्रार असल्याची माहिती समोर आलेली आहे. (Commencement of Democracy Fortnight program in Thane Municipal Corporation area)
इतर बातम्या
Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेकडून सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, सात आरोपींना अटक