Hijab Row: हिजाब आंदोलनाचं लोण कल्याणमध्येही, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या निदर्शनावेळी राडा; महिला आपसात भिडल्या
हिजाब आंदोलनाचं लोण आता कल्याणमध्येही येऊन ठेपले आहे. हिजाबच्या समर्थनार्थ आज काँग्रेसच्या महिला आघाडीने मोर्चा काढला. शिवाजी चौकात हा मोर्चा आला. यावेळी महिला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रचंड संख्येने महिला जमल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडीही झाली.
कल्याण: हिजाब आंदोलनाचं (Hijab Row) लोण आता कल्याणमध्येही (kalyan) येऊन ठेपले आहे. हिजाबच्या समर्थनार्थ आज काँग्रेसच्या (congress) महिला आघाडीने मोर्चा काढला. शिवाजी चौकात हा मोर्चा आला. यावेळी महिला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रचंड संख्येने महिला जमल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडीही झाली. मात्र, अचानक महिलांमध्येच झटापट सुरू झाली. काही महिलांनी वाद घातल्याने या महिला आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. अचानक दोन गटात बाचाबाची सुरू झाल्याने वातावरण तंग झालं. पोलिसांचीही काही काळ भंबेरी उडाली. महिला पोलिसांची कुमक बोलावून या आंदोलक महिलांना पांगवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. हे आंदोलन उधळून लावण्यासाठी काही महिला पाठविण्यात आल्याचा आरोप काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी केला आहे. तर, या महिला कोण होत्या याबाबतची काहीच माहिती मिळू शकलेली नाही.
महिला काँग्रेस आघाडीने आज दुपारी हे आंदोलन केलं. कर्नाटकात हिजाबवरुन सुरु असलेल्या वादंग देशभरात पसरला आहे. अनेक ठिकाणी हिजाबच्या समर्थनात आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या महिला आघाडीकडून हिजाबच्या समर्थनासाठी छत्रपती शिवाजी चौक परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनाकरीता काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. आंदोलन सुरु झाले. त्याचवेळी गझल मांडेकर नावाच्या एका महिलेने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत वाद घातला. गझल मांडेकर यांचे म्हणण आहे की, हिजाब आमचा हक्क आहे. तो हिरावून घेऊन शकत नाही. मात्र काँग्रेस राजकारण करीत आहे. त्यानंतर येथील काँग्रेस कार्यकर्त्या आणि गझल सोबत असलेल्या काही महिलांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.
अन् आंदोलन उरकले
दरम्यान, या महिलांचा विरोध आणि अचानक झालेल्या झटापटीमुळे काँग्रेसला हे आंदोलन उरकावले लागले. आमचे आंदोलन शांतते सुरु होते. आंदोलन उधळून लावण्यासाठी महिला पाठविण्यात आल्या होत्या. या महिलांना कोणी पाठविले हे आम्हाला माहिती नाही. याची आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहोत, असं कांचन कुलकर्णी यांनी सांगितलं.
पोलिसांची बघ्याची भूमिका
दरम्यान, हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं महिलांचं म्हणणं आहे. आंदोलनावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. थोडेच पोलीस होते. शिवाय वाद सुरू झाल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद घालणाऱ्या महिलांना हुसकावून लावले असते तर आंदोलन शांततेत पार पडले असते. कोणताही वाद झाला नसता, असं काही महिलांनी सांगितलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 February 2022 pic.twitter.com/rXKVpyP2hd
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2022
संबंधित बातम्या:
VIDEO: प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा