Jitendra Avhad : कोरोना विचित्र असला तरी त्याने मानवी नातेसंबंधातील संवाद घडविला : जितेंद्र आव्हाड

या नववर्ष जल्लोष कार्यक्रमात बाईक रॅली, नाचगाणी, सिने नट-नट्यांची धम्माल मस्ती यामुळे तरूणाईसह ज्येष्ठ नागरिकांनीही जोरदार धम्माल केली. या कार्यक्रमास सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या दोघांनी तरूणाईमध्ये जोश भरला. या दोघांनी ढोल पथकाचा ताबा आपणाकडे घेऊन ढोल वाजवित तरूणाईला ठेका धरण्यास लावले.

Jitendra Avhad : कोरोना विचित्र असला तरी त्याने मानवी नातेसंबंधातील संवाद घडविला : जितेंद्र आव्हाड
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रियाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 10:32 PM

ठाणे : दोन वर्ष कोंडमारा झाला होता. पण याच काळात पतीला पत्नीचा आणि पत्नीला पतीचा खरा स्वभाव कळला. कारण, सर्वच घरात बंदिस्त झाले होते. आईवडील, आजीआजोबा, मुलं ही मंडळी घरात एकत्र राहिली. कोरोना (Corona) हा रोग विचित्र आणि धोकादायक होता. पण त्यामुळे का होईना. मानवी संवाद घडून आला, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केले. पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन आणि अभिजीत पवार मित्र मंडळ यांच्या वतीने पारसिक नगर येथे नववर्ष जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड बोलत होते. याप्रसंगी मंचावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशनचे अभिजीत पवार हे उपस्थित होते. (Corona developed communication in human relationships Jitendra Awhad says)

येत्या 1 व 2 मे रोजी ठाणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर संगीतमय कार्यक्रम

एखादी गोष्ट नातेसंबंधात शेअरिंग करणे जवळपास बंदच झाले होते. आपण घरात तसे करतही नाही. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी मित्रांकडे शेअर करीत असतो. कुटुंबात एक अदृश्य पडदा असतो. पण, मैत्रीत तो नसतो. त्याच अनुषंगानेच सांगतो की मी एवढे वर्ष आमदार आहे. पण, अभिजीत पवारने जेवढे मित्र तयार केले आहेत. तेवढे मित्र आपणालाही करणे शक्य झाले नाही. त्यामुळेच हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या अभिजीत पवार आणि त्याच्या टीमचे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे. येत्या 1 व 2 मे रोजी पारसिक नगर येथे ठाणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केली.

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आजच्या तरूणाईने विकासात्मक मार्ग धुंडाळत असताना आपल्या परंपरांकडे दुर्लक्ष करू नये, या उद्देशाने पारंपारिक वेशभूषेतील महिलांना दुचाकी चालविण्यास प्रोत्साहन देऊन परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ साधला, असे अभिजीत पवार म्हणाले.

नववर्ष जल्लोष कार्यक्रमात तरुणाईसह जेष्ठ नागरिकांचीही धमाल

दरम्यान, या नववर्ष जल्लोष कार्यक्रमात बाईक रॅली, नाचगाणी, सिने नट-नट्यांची धम्माल मस्ती यामुळे तरूणाईसह ज्येष्ठ नागरिकांनीही जोरदार धम्माल केली. या कार्यक्रमास सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या दोघांनी तरूणाईमध्ये जोश भरला. या दोघांनी ढोल पथकाचा ताबा आपणाकडे घेऊन ढोल वाजवित तरूणाईला ठेका धरण्यास लावले. विशेष म्हणजे, नववर्षाच्या स्वागतासाठी काढलेल्या बाईक रॅलीमध्येही ॠता आव्हाड, सिद्धार्थ जाधव, अभिजीत पवार यांनी सहभाग नोंदवत तरूणांना प्रोत्साहित केले. या दुचाकी रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. पारंपारिक वेशभूषा केलेल्या सुमारे 500 महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. (Corona developed communication in human relationships Jitendra Awhad says)

इतर बातम्या

Ambernath Crime : अंबरनाथच्या चिखलोली धरणात अज्ञात मृतदेह आढळला, शिवाजी नगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

Jitendra Awhad on Raj Thackeray: मदरश्यात दाढीचा वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.