ठाणे : राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पालकांनी आपल्या मुलांना लसीकरणासाठी घेऊन यावे, असे आवाहन केले आहे. तसेच लसीकरणादरम्यान गर्दी होऊ नये म्हणे ठाणे ग्रामीणमध्ये दहा विशेष लसीकरण केंद्रे तयार केली आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या केंद्रांवर लस दिली जाईल. लोकमत या मराठी वृत्तपत्रात याबाबत अधिकची माहिती देण्यात आली आहे.
आजपासून संपूर्ण भारतात 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी कोवीन वेबसाईटवर नावनोंदणी करावी लागणार आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील नावनोंदणी करता येईल. ठाणे ग्रामीण भागात केंद्राच्या सूचनेनुसार लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण भागात दहा विशेष लसीकरण केंद्रांची उभारणी केली गेलीय.
जिल्हाभरातील ग्रामीण भागातील किशोरवयीन मुला-मुलींना सहजपणे लस उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाने दहा लसीकरण केंद्र सुरु केले आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे
♦ ठाणे जिल्हा रुग्णालय
♦ उपजिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी
♦ ग्रामीण रुग्णालय मुरबाड
♦ शहापूर तालुक्यातील वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्र
♦ अंबरनाथ तालुक्यातील वांगणी आरोग्य केंद्र
♦ कल्याण तालुक्यातील खडवली आरोग्य केंद्र
♦ भिवंडी तालुक्यातील आनगाव आरोग्य केंद्र
♦ मुरबाड तालुक्यातील शिवळा आरोग्य केंद्र
♦ जीवनदीप कॉलेज गोवेली
♦सेक्रेड हायस्कुल
इतर बातम्या :