जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा, पोलिसांनी कारवाई का केली ते सांगितलं
तपासामध्ये व्हिडीओ जप्त करून सत्यता पडताळण्यात येईल. त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल.
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाच्या गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन यामागचं कारण सांगितलं. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल वाय जंशन पुलाचे उद्घाटन झाले. उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर महिलेनं तक्रार दिली. त्यानुसार कार्यक्रम संपत असताना लोकप्रतिनिधी यांनी विनयभंग केल्याची तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार, 354 आयपीसीनुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचं मुंब्रा पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणाचा एसीपी नवपाडा या तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
व्हिडीओ व्हायरल झाला. तपासामध्ये व्हिडीओ जप्त करून सत्यता पडताळण्यात येईल. त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल. 40 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. विनयभंगाच्या अनुषंगानं व्हिडीओ क्लीप सादर केली आहे. सोशल मीडियावरही त्याची व्हिडीओ क्लीप फिरत आहे. त्याची सत्यता पुरावा म्हणून तपासली जाईल, असंही ठाणे पोलीस म्हणाले.
मुंब्रा येथे शांतता राहण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान दाखल झाले आहेत. स्थानिक पोलीस, जादा कुमक तसेच मुंब्रा येथे पोलीस तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा हद्दीत ठिकठिकाणी घटना घडल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
ज्या घटना घडल्या आहेत, त्याबाबत चौकशी करण्यात येईल. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायदा सुव्यवस्था बंदोबस्ताकडं लक्ष्य आहे. तपास प्रक्रिया सुरू आहे. थेट जाऊन जबाब नोंदविण्यात आला नाही.
आज सकाळी तक्रारदार महिलेविरुद्ध एक तक्रार शिवा जगताप यांनी नोंदविली आहे. यानुसार, दहा-पंधरा दिवसांपूर्वीची घटना असलेलं सांगितलं. त्यावरून मुंब्रा येथे गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिसेसह आणखी एका व्यक्तीचा त्यात समावेश आहे, असं मुंब्रा पोलिसांनी सांगितलं.