मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळताच अटक करणाऱ्या डीसीपींची बदली

जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळताच त्यांना अटक करणाऱ्या डीसीपींची बदली झालीय.

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळताच अटक करणाऱ्या डीसीपींची बदली
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 7:36 PM

ठाणे : ठाण्यातील गेल्या दोन दिवसांपासूनच्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी अटक केली होती. त्यांना आज मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळाला. जामिनानंतर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांवर दबाब होता. आपल्यावर झालेल्या कारवाईमध्ये पोलिसांची काहीच चूक नव्हती, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर एक मोठी बातमी समोर आलीय. जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळताच त्यांना अटक करणाऱ्या डीसीपींची बदली करण्यात आलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीसीपी विनयकुमार राठोड यांची परिमंडळ 5 मधून वाहतूक शाखेत बदली करण्यात आलीय. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी जामीन मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी विनयकुमार राठोड यांचं नाव घेत आपल्या अटकेसाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता, असं म्हटलं होतं.

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेनंतर डीसीपी विनयकुमार राठोड यांच्या बदलीची बातमी समोर आलीय. विनयकुमार राठोड यांची अशी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाड पोलिसांबद्दल नेमकं काय म्हणाले?

“ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलता मला प्रत्येक मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे हतबल होते. कारण असं कुणाला अटक करत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“या प्रकरणात तक्रारदारच नाही. म्हणजे कोणतीही कायदेशीर बाजू न पडताळता घाईगडबडीत अटक करण्यात आली. आम्ही काहीही करु शकतो हे फक्त महाराष्ट्राला दाखवण्यासाठी अटक केली”, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर पत्रकार परिषदेतून केला होता.

देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. “एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही आव्हाडांची स्टाईलच आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.