रेल्वे स्टेशनवर बॅरिकेट्स ऐवजी नायलॉन दोरीचा वापर, कल्याणमध्ये गळ्याला फास लागून दोघा मित्रांचा मृत्यू

नायलॉनच्या दोरीमुळे झालेल्या विचित्र अपघातात दोन युवकांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण स्टेशन परिसरात घडली.

रेल्वे स्टेशनवर बॅरिकेट्स ऐवजी नायलॉन दोरीचा वापर, कल्याणमध्ये गळ्याला फास लागून दोघा मित्रांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 6:49 PM

ठाणे : नायलॉनच्या दोरीमुळे झालेल्या विचित्र अपघातात दोन युवकांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण स्टेशन परिसरात घडली आहे. कोळसेवाडी पोलीस घटनेचा तपास करत आहेत. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या कुटुंबियांनी केली आहे (Death of two friends in accident due to nylon thread in Kalyan railway station).

कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात राहणारे योगेश सांगळे आणि मुकेश राय हे दोघे चांगले मित्र होते. मुकेश राय हा कल्याण पूर्व भागातील जिम्मी बाग परिसरात राहत होता. योगेश सांगळे हा कल्याण पूर्व भागातील जगताप वाडीत राहत होता. गुरुवारी (11 फेब्रुवारी) योगेशला कामावर जायचं होतं म्हणून मुकेश रायने त्याला आपल्या दुचाकीवर बसवून कल्याण रेल्वे स्टेशनला निघाला. लोकल 7 नंबर प्लेटफॉर्मवर उभी होती. 7 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर जात असताना याच दरम्यान समोर बॅरीकेट्स ऐवजी लावण्यात आलेली नायलॉन दोरी मुकेशच्या गळ्यात अडकली. त्याचा गळा कापला गेला. तो खाली पडला.

यानंतर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र योगेशही गाडीच्या खाली आपटला गेला. या अपघातात दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला. मुकेशचे 2 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मुकेशचे भाऊ सुनिल राय म्हणाले, “बॅरीकेट ऐवजी नायलॉनची रस्सी लावली होती. रस्सी न दिसल्याने हा प्रकार घडला. या प्रकरणी जे कोणी दोषी आहेत त्याच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे.” योगेश नाशिकचा रहिवासी आहे.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात झाला आहे. पूढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल पोवार यांनी दिलीय. घटना कशामुळे झाली. त्याला नेमके कोण जबाबदार आहे? हा तपासाचा भाग आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लँडिंगआधी काही अंतरावर विमान डोंगराला धडकलं, प्रवास करणाऱ्या सर्व 119 जणांचा मृत्यू

ट्रकची कारला भीषण धडक, मुक्ताईनगरातील काँग्रेसचे जिल्हा सचिवांचा जागीच मृत्यू

ऊसाच्या ट्रॅक्टरला फॉर्च्यून धडकली; एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार

व्हिडीओ पाहा :

Death of two friends in accident due to nylon thread in Kalyan railway station

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.