Mesta : मेस्टाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी

राज्यभरात इंग्रजी माध्यमाच्या 40 हजार शाळा आहे. त्यापैकी 18 हजार शाळा मेस्टाशी संलग्न आहे. 9 हजार शाळा बेकायदेशीर आहेत. त्यामुळे 18 हजार मेस्टा संलग्न शाळा वगळता अन्य 22 हजार शाळा या मेस्टाशी संलग्न नसताना संलग्न असल्याचे सांगून सरकारच्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहे.

Mesta : मेस्टाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी
मेस्टाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या शाळांच्या विरोधात कारवाईची मागणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 8:18 PM

कल्याण : मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांनी 15 टक्के शुल्क कपात (Fee Reduction) केली असल्यास त्यांच्या विरोधात सरकारने कारवाई करुन नये असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र ज्या शाळा मेस्टा (Mesta)शी संलग्न नाही. त्यांनी देखील 15 टक्के कपात केली आहे. त्यांच्या विरोधातील सरकारी कारवाईपासून वाचण्याकरीता त्या मेस्टाच्या नावाचा गैरवापर करीत आहे. अशा शाळांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मेस्टाचे अध्यक्ष डॉ. संजय तायडे यांनी केली आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोशिएशनचे अध्यक्ष तायडे यांच्या उपस्थितीत आज नंदी पॅलेस हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. (Demand for action against schools that misuse Mesta’s name)

22 हजार शाळांचा कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न

या बैठकीला इंग्रजी शाळांचे विश्वस्त उपस्थित होते. त्याचबरोबर प्रा. गजानन पाटील, राजेश उज्जैनकर, ठाणे जिल्हाध्यक्ष शितल तेंबलकर, प्रा. के. एस. अय्यर आदी उपस्थित होते. अध्यक्ष तायडे यांनी सांगितले की, मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांना 25 टक्के शुल्क सवलत दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट 15 टक्के शुल्क कपात करण्यात आली. मात्र मेस्टाने आधीच 25 टक्के शुल्क सवलत दिली असल्याने 15 टक्के शुल्क कपात मान्य नसल्याचे म्हटले होते. न्यायालयाने मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांच्या विरोधात कारवाई केली जाऊ नये असे म्हटले आहे. राज्यभरात इंग्रजी माध्यमाच्या 40 हजार शाळा आहे. त्यापैकी 18 हजार शाळा मेस्टाशी संलग्न आहे. 9 हजार शाळा बेकायदेशीर आहेत. त्यामुळे 18 हजार मेस्टा संलग्न शाळा वगळता अन्य 22 हजार शाळा या मेस्टाशी संलग्न नसताना संलग्न असल्याचे सांगून सरकारच्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी अध्यक्ष तायडे यांनी केली आहे. (Demand for action against schools that misuse Mesta’s name)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे गजाआड

Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापावर पोरांचा संताप, एकदाची अद्दल घडवली

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.