एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक श्रेय घेतात; फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला

भाजप (bjp) सरकारच्या काळात झालेल्या कामाचं महाविकास आघाडीकडून (maha vikas aghadi) श्रेय घेतलं जात आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक श्रेय घेतात; फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला
एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक श्रेय घेतात; फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 6:39 PM

ठाणे: भाजप (bjp) सरकारच्या काळात झालेल्या कामाचं महाविकास आघाडीकडून (maha vikas aghadi) श्रेय घेतलं जात आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच नियमावली मंजुरी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीला आणखी एक वर्षभराचा कालावधी लागला. सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांनी सपाटा लावला आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे. एखाद्याचे लग्न झाले किंवा एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात. आमच्या प्रेरणेने त्यांना मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता हा टोला लगावला. मात्र, त्यांच्या टीकेचा रोख ठाकरे सरकारवर असल्याचं बोललं जात आहे.

ठाण्यात सकल मराठा समाजाच्याने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुणाचेही नाव न घेता हा टोला लगावला. यावेळी भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निधीतून ठाण्यात दिव्यांग स्नेही उद्यान व आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून उभारलेल्या कै. वसंतराव डावखरे प्रेक्षा गॅलरीसह विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. तसेच ठाण्यातील भाजपा नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे तसेच इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

शिवरायांचे राज्य हे वंचितांचे राज्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीची संख्या न पाहता वंचितांचे राज्य उभारले. राम राज्यानुसार सर्वांना समान अधिकार दिले. तेच सूत्र पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणकारी सरकार चालविले जात आहे. तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

म्हणून महाराज पराभूत होत नाहीत

आमचा भगवा आठवण करून देतो त्यागाची. ज्या काळात महाराष्ट्रावर अत्याचाराची मालिका सुरू होती. त्या काळात एका क्रांतीचा जन्म झाला. ती क्रांती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आठरपगड जातींना एकत्रित केलं. मावळ्यांची संख्या कमी होती. पण ते लाखांना भारी होते. या लढवय्या मावळ्यांना पाहून औरंगजेबही अचंबित झाला होता. शिवाजी महाराजांना परास्त का करू शकत नाही? असा सवाल त्यांनी केला होता. त्यावेळी, औरंगजेबाच्या दरबारींनी जे उत्तर दिलं ते थक्क करणारं होतं. आपलं सैन्य लढतं ते आपल्याकडे नोकर आहे म्हणून. शिवाजी महाराजांचे मावळे हे स्वत: करता लढत नाहीत. तर रयतेसाठी लढत असतात. त्यामुळेच ते आपल्याला पराजित करत असतात. जोपर्यंत मावळ्यांच्या रक्तात, विचारात आणि कृतीत शिवाजी आहे तोपर्यंत ते पराजित होऊ शकणार नाही, असं उत्तर औरंगजेबाला देण्यात आलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पुण्यात भाजप, राष्ट्रवादीला शिवसेनाचा धक्का, अर्धा डझन नेत्यांच्या हाती शिवबंधन

ठरलं! एकमेकांच्या विरोधात जायचं नाही, बोलायचं नाही, ठाणे, केडीएमसी, पालघरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार?

Ajit Pawar | अजितदादांनी ज्याला सुपारी घेऊन आलाय का विचारलं, तोच निघाला संभाजी छत्रपतींचा माजी पीए

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.