ठाणे: मनसे अध्यक्षव राज ठाकरे (raj thackeray) यांनी अयोधा (ayodhya) दौरा स्थगित केल्यानंतर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (dipali sayyad) यांनी राज यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट नाही. ते स्वयं घोषित हिंदू जननायक आहेत. अखरे त्यांनी दौरा रद्द केला. मी तर आजही सांगते की, घाबरत असेल तर आदित्य साहेबांचा हात पकडा. न घाबरता तुम्ही तिथे जावू शकाल. मी पुन्हा येईन, मी जाणार… भाजपचे हे जे स्लोगन तुम्ही घेवून चाललेला आहात. ते लोकांना दिसत आहे. आज जाणार, उद्या जाणार सांगत तुम्हाला दौरे रद्द करावे लागत आहेत. खरं तर तुम्ही आदित्य ठाकरेंचा हात पकडा. तुम्हाला परत दौरे रद्द करावे लागणार नाहीत, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
विरोध तर होणारचं. जे तुम्ही केलं होतं ते लोक आजही विसरले नाहीत. तुमची भूमिका स्पष्ट होत नाही. इकडून यूपी बांधवांना तुम्ही मारमारून हकलून लावलं होतं, तिथे तुम्ही जाण्याच्या गोष्टी करता. कुठे तरी वाद तर होणारचं ना? तुम्ही क्षमा मांगा. तिथे जा. काय करायचं हे तुम्हाला स्वतः कळतं नाही, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुम्ही कितीवेळ घेणार आहात. दोन तालुक्यापुरती तुमची ताकद आहे. वर्षानुवर्ष तुमचे काम चालू आहे. कुठे आहेत तुमचे कार्यकर्ते? तुम्ही स्वत: पळून जाता. एवढा मोठा मुद्दा होता. तुम्ही पुढाकार घेतला तर पळून का गेला? समोरासमोर जायचं होतं ना? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांवर काय बोलायचं? आता मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता त्यांच्यावर एसीबीची कारवाई झाली. त्यांच्याकडे करोडो रुपये सापडले. त्यांच्यावर ईडी कारवाई केली जाते का? कुठे गेली ईडी? तुमचा माणूस म्हणून तुम्ही ईडीची कारवाई करणार नाहीत. कारण सेनेचा माणूस नाही. सेनेचा माणूस असता तर कारवाई केली असती.