Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron : दिलासादायक! राज्यातल्या पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज, आयुक्त म्हणाले…

राज्यातला ओमिक्रॉन(Omicron)चा पहिला रुग्ण बरा झालाय. त्याला रुग्णालयातून घरीही सोडण्यात आलंय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तां(kalyan dombivli municipal corporation commissioner)नी ही माहिती दिलीय.

Omicron : दिलासादायक! राज्यातल्या पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज, आयुक्त म्हणाले...
केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 12:27 PM

कल्याण-डोंबिवली : एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातला ओमिक्रॉन(Omicron)चा पहिला रुग्ण बरा झालाय. त्याला रुग्णालयातून घरीही सोडण्यात आलंय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तां(kalyan dombivli municipal corporation commissioner)नी ही माहिती दिलीय.

राहावं लागणार क्वारंटाइन संबंधित रुग्ण ३३ वर्षांचा असून त्याची मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याची ओमिक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र योग्य उपचार घेतल्यानंतर आता त्याची चाचणी निगेटिव्ह आलीय. रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलंय, अशी माहिती आयुक्त विजय सूर्यवंशी (KDMC commissioner Vijay Suryavanshi) यांनी दिलीय. संबंधित रुग्णाला ७ दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

ट्रॅव्हल हिस्ट्री मेकॅनिकल इंजिनिअर असलेला हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. जिनोमि सिक्वेन्सिंग(Genome Sequencing)साठी त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर ४ डिसेंबरच्या दरम्यान या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं.

आरोग्यमंत्र्यांचं आवाहन आरोग्यमंत्री राजे टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले, की घाबरण्याचे शून्य टक्केदेखील कारण नाही. या विषाणूचा मृत्यूदर खूप कमी आहे. मात्र त्याचा संसर्गदर जास्त आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या संपर्कात पाच मिनिटेजरी एखादा व्यक्ती आला तर त्यालादेखील ओमिक्रॉनची लागण होते. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.

VIDEO | मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र करणार, केडीएमसी आयुक्तांची माहिती

VIDEO | कोरोनाकाळात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एमपीएससी परीक्षेसाठी एक वाढीव संधी, लवकर शासन निर्णय येणार

जगभर ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मुंबईत ओमिक्रॉनसाठी 250 बेड सज्ज; लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.