VIDEO : टोकण घेऊन सहा तास रांगेत, लसीसाठी नंबर आलाच नाही, कल्याणच्या लसीकरण केंद्रावर संतप्त नागरिकांचा राडा

राज्यासह देशभरात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झालंय (Dispute at Vaccination center in Kalyan).

VIDEO : टोकण घेऊन सहा तास रांगेत, लसीसाठी नंबर आलाच नाही, कल्याणच्या लसीकरण केंद्रावर संतप्त नागरिकांचा राडा
कल्याणच्या लसीकरण केंद्रावर वाद
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 2:58 PM

कल्याण : राज्यासह देशभरात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झालंय (Dispute at Vaccination center in Kalyan). पण लसीच नसल्या कारणामुळे आता प्रशासन हतबल झालंय. दुसरीकडे लसींसाठी तब्बल सहा ते आठ तास रांगेत उभं राहून नागरिकांना लसी मिळत नाहीयत. त्यामुळे हताश झालेल्या नागरिकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय. कल्याणच्या एका लसीकरण केंद्रावर अशीच काहीशी घटना घडली. लसीसाठी टोकण घेऊन सहा ते आठ तास रांगेत उभं राहून लसी मिळाल्या नाहीत म्हणून नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर आकांडतांडव केला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे (Dispute at Vaccination center in Kalyan).

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील लाल चौकी येथील आर्ट गॅलरी येथे लसीकरण सुरु आहे. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. महापालिकेकडे 200 जणांनी रजिस्ट्रेशन केले. मात्र रजिस्ट्रेशन केलेले फक्त आठ जण लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पोहचले. अनेक नागरीक आज पहाटे चार वाजल्यापासून आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी रांग लावून बसले होते. रजिस्ट्रेशन केलेले नागरीक लसीकरणासाठी कमी प्रमाणात आल्याने आम्हाला लस द्यावी, अशी मागणी रांगेत उभे असलेल्या नागरीकांनी केली. त्यावेळी नागरीकाना टोकण देण्यात आले.

नागरिकांचा गोंधळ

टोकण दिलेल्या नागरीकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन असलेल्यांनाच लस दिली जाईल, असे दुपारी सांगण्यात आले. त्यामुळे आम्हाला टोकण कशाला दिले? जर लस द्यायची नाही तर आधीच सांगितले पाहिजे होते ना? असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावेळी केडीएमसीच्या उपायुक्त पल्लवी भागवत, केडीएमसीचे अधिकारी संदीप निंबाळकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करत परस्थिती नियंत्रणात आणली. खरंतर महापालिकेच्या गोंधळामुळेच लसीकरण केंद्रावर नागरीकांचा हा गोंधळ उडाला.

लसींअभावी लसीकरण केंद्रे बंद

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्रावर तीन महिन्यांपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरणास सुरुवारत करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राकडून राज्याला लसीचा पुरवठा कमी करण्यात येत असल्याने लसींचा साठा कमी पडू लागला. त्याचा फटका कल्याण डोंबिवलीतील लसीकरणासही बसला आहे. याआधी 45 वर्षे वय असलेल्यांना लसीकरण दिले जात होते. 1 मे पासून 18 ते 44 या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण केले जाईल, असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले. मात्र पुरेशा लसी उपलब्ध नसल्याने सर्व लसीकरण केंद्राचे लसीकरण बंद पडलं.

आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्रावरील गोंधळ बघा :

कल्याणच्या नेतीवली येथील प्रबोधनकार ठाकरे या सरकारी शाळेच्या लसीकरण केंद्रावरील दृश्य 

कल्याण पूर्वेतील नेतीवली येथील प्रबोधनकार ठाकरे या सरकारी शाळेतही लसीकरण सुरु आहे. या लसीकरण केंद्रावर टोकण पद्धतीने लसीकरण सुरु आहे. मात्र, या ठिकाणी देखील तासंतास उभं राहून अनेक नागरिकांना लस मिळत नाही, असं दृश्य आहे. या लसीकरण केंद्रावरील वातावण बघा :

कल्याणच्या मांगरुल गावातील लसीकरण केंद्रावर भयान गर्दी

कल्याणमधील मांगरुल गावात लसीकरण सुरु असल्याचे लोकांना कळताच तेथे देखील नागरिकांची तुफान गर्दी होत आहे. तिथे लसीकरण प्राधान्याने देण्यावरुन स्थानिक नागरिक आणि शहरातील नागरिक यांच्यात बाचाबाची झाल्याचा घटना देखील समोर आल्या आहेत.

हेही वाचा : आधी लगीन लसीकरणाचं; मुलाच्या लग्नाचा पैसा नागरीकांच्या लसीकरणावर खर्च करणार, आमदार गणपत गायकवाडांचा नवा आदर्श

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.