भाजी बनवून ठेव म्हणून सांगून गेले ते परतलेच नाही… शिंदे गटाचा नेता 20 तारखेपासून बेपत्ता?; कुटुंबीयांच्या डोळ्याला धारा

Ashok Dhodi Missing Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक पदाधिकारी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

भाजी बनवून ठेव म्हणून सांगून गेले ते परतलेच नाही... शिंदे गटाचा नेता 20 तारखेपासून बेपत्ता?; कुटुंबीयांच्या डोळ्याला धारा
पदाधिकारी बेपत्ता
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 3:13 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक पदाधिकारी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अशोक धोडी हे 20 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजल्या पासून ते बेपत्ता आहे. ते शिंदे गटाचे डहाणू येथील पदाधिकारी आहेत. झाई बोरिगाव रस्त्याच्या चढण वर त्यांच्या ब्रिझा कारवर हल्ला करण्यात आला आणि त्यांचे अपहार केल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

तीन संशयितांवर गुन्हा

त्याच घटनास्थळावर ब्रिझा गाडीच्या काचा ही पडल्या आहेत. काल या सर्व प्रकरणात घोलवड पोलीस ठाण्यात तीन संशयित अपहरण कर्त्यावर अपहरणाचा गुन्हाही दाखल केला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी ही करून, ड्रोन कॅमेऱ्यातून सर्व डोंगरची पाहणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना नेते अशोक धोडी यांच्या मिसिंग प्रकरणात काल रात्री घोलवड पोलीस ठाण्यात तीन संशयित वर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या तीन संशयीता मध्ये अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी यांच्यासह अन्य दोघांची नावं आहेत.

या सर्व प्रकारामध्ये पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वत: लक्ष घातले असून, सर्व तपासासाठी पालघर गुन्हे शाखे सह घोलवड पोलीस ठाणे आणि इतर 30 ते 40 पोलीस अधिकारी कर्मचारी तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. 8 दिवस होऊन ही अशोक धोडी यांच्या अपहरणाचा तपास लागला नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.. आता हा घातपात आहे की केवळ अपहरण, जागेचा वाद, कौटुंबिक वाद आहे या सर्व बाजूनी तपास सुरू आहे.

अजूनही फोन बंद

घटनेच्या दिवशी माझे पती मला मुंबईला जाऊन येतो कामा निमित्त असे सांगून गेले होते. मुंबई, ठाण्याला जाताना नेहमी डहाणू ला गाडी ठेवून रेल्वे ने जातात, मला सोमवारी फोन करून ही सांगितले की भाजी बनवून ठेव म्हणून, मी घरी येतोय असे सांगितले .. मी स्वयंपाक बनवून फोन लावला तर माझा फोन लागला नाही. ते आजपर्यंत फोन त्यांचा बंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिली आहे.

दुसर्‍या दिवशी आजूबाजूच्या मुलांनी विचारले साहेब घरी आले का पण फोन बंद, असल्याने आम्ही सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण भेटले नाहीत तेव्हा आम्ही नंतर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आमचे फार काही टोकाचे कुणासोबत वाद नव्हते, पण त्यांच्या भावा सोबत कौटुंबिक वाद होते, आम्ही संशयीतांची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांच्या पत्नीने मागणी केली आहे

या अगोदर दोनदा हल्ला

आम्ही ज्या संशयितांची नावे दिली आहेत त्यांनी आमच्या वडिलांवर दोन वेळा हल्ला ही केला होता. मनोज रजपूत आणि अविनाश धोडी या दोघांची नाव पोलिसांना दिली आहेत. यांनीच आमच्या घरी येऊन सुद्धा वडिलांवर हल्ला सुद्धा केला होता, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. पोलिसांच्या कारवाईवर आम्ही समाधानी आहोत. पण पोलिसांनी लवकर या प्रकरणाचा छडा लावून माझे वडील सुखरूप घरी यावेत अशी अपेक्षा अशोक धुडी यांची पत्नी आणि मुलाने व्यक्त केली आहे.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.