आता उणे तिथे ठाणे असे म्हणावे लागेल… एकनाथ शिंदेंकडून पालिका कर्मचाऱ्यांचं भरभरून कौतुक
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ठाणे महापालिकेने अत्यंत चांगलं काम केलं. त्यानंतर कोकणात आलेल्या पूरपरिस्थितीतही ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगली कामगिरी बजावली. (eknath shinde)
ठाणे: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ठाणे महापालिकेने अत्यंत चांगलं काम केलं. त्यानंतर कोकणात आलेल्या पूरपरिस्थितीतही ठाणे पालिकेचे कर्मचारी आणि टीडीआरएफच्या जवानांनी अत्यंत चांगली कामगिरी बजावली. या कामाची दखल स्वत: तिथल्या लोकांनी घेतली. ठाणे महापालिका नसती तर काय झालं असतं? असं स्थानिक म्हणत होते, असं सांगतानाच आपण ठाणे तिथे काय उणे म्हणत असतो. पण आता उणे तिथे ठाणे असे म्हणावे लागेल, असं राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (eknath shinde hoists national flag at thane district collector office)
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, महापौर नरेश म्हस्के, पोलिस आयुक्त जयजीत सिंग, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, भाजप आमदार संजय केळकर व इतर अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहण सोहळया निमित्ताने पोलीस आणि राज्य राखीव सुरक्षा दलाच्या बँड पथकाने मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
त्यांना विम्याचा फायदा मिळावा
कोविड काळात अनेक जणांनी कामे केली. काहींच्या घरातील समस्या आपण जवळून बघितल्या, अनेक संकटे पाहिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनबाबत आपण खूप मेहनत घेतली. ऑक्सिजन संपायच्या आधी आपण अॅलर्ट झालो, अशीही वेळ आली होती. पोलिस दल असो वा सर्वसामान्य लोक… या काळात अनेकांनी कामावर असताना आपले प्राण गमावले. त्यांना विम्याचा फायदा मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, असं शिंदे म्हणाले.
टीडीआरएफच्या जवानांची मेहनत
कोकणातील पूरपरिस्थितीच्या काळात ठाणे महापालिकेने चांगलं काम केलं आहे. टीडीआरएफच्या जवानांनी खूप मेहनत घेतली. ठाणे महापालिका नसती तर काय झाले असते असं स्थानिक लोक म्हणत आहेत. आपण ठाणे तिथे काय उणे म्हणत असतो. पण आता उणे तिथे ठाणे असे म्हणावे लागेल. सर्व राज्यांनी ठाण्याची दखल घेतली. महाड, चिपळूण भागात ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अनेक कॅम्प केले आणि या भागात होणारा रोगराईचा प्रादुर्भाव रोखला, असंही त्यांनी सांगितलं.
कृषी विभागात अनेक बदल करणार
कृषी विभागात अनेक बदल करत आहोत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल असे आपण काम करत आहोत. तसेच ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नावीन्य पूर्ण काम सुरू आहे. निवडणुका येत जात असतात मात्र सर्व जण एक दिलाने काम करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. कोविड अजून गेलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असं आवाहनही त्यांनी केलं. (eknath shinde hoists national flag at thane district collector office)
देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन #ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करून उपस्थित सर्व मान्यवरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.#स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #IndependenceDay #IndiaAt75 pic.twitter.com/fft9XhXgpQ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 15, 2021
संबंधित बातम्या:
असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला
मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव
Independence Day Live Updates : कोरोनाचे नियम पाळा, लवकर कोरोनाला हद्दपार करु- उद्धव ठाकरे (eknath shinde hoists national flag at thane district collector office)