Dombivali : काम होणार, आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल; एकनाथ शिंदे यांनी मनसे आमदारांना काढला चिमटा
डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्त्यांकरीता 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी हा निधी मंजूर करण्यात आला होता. काम सुरु होत नसल्याने मनसेकडून वारंवार बॅनर लावून शिवसेनेला डिवचले जात होते. कोणत्याही कामाला सुरु करण्यास काही पद्धत आणि नियम असतात, असे वारंवार शिवसेनेकडून सांगितले जात होते.
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र काम सुरु झाले नव्हते. त्यासाठी मनसे (MNS) कडून शिवसेने (Shivsena) ला वारंवार बॅनर लावून डिवचले जात होते. आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन झाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना काम सुरु होतेय, आता बॅनर लावले पाहिजेत असा चिमटा काढला. चांगले काम केले तर बोलायला काय हरकत आहे. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे. हा लोकांचा विजय आहे. काम सुरु झाले तर मी अभिनंदनाचा बॅनर लावणार अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. (Eknath Shinde scolds Raju Patil over development of Dombivali MIDC roads)
निधी मंजूर होऊनही काम सुरु होत नसल्याने मनसेकडून डिवचले जात होते
डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्त्यांकरीता 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी हा निधी मंजूर करण्यात आला होता. काम सुरु होत नसल्याने मनसेकडून वारंवार बॅनर लावून शिवसेनेला डिवचले जात होते. कोणत्याही कामाला सुरु करण्यास काही पद्धत आणि नियम असतात, असे वारंवार शिवसेनेकडून सांगितले जात होते. मात्र मनसेकडून बॅनर बाजी सुरुच होती. काही दिवसांपूर्वी मनसेकडून डोंबिवली येथील मिलापनगर परिसरात पोस्टकार्ड बॅनर लावण्यात आला. तो बॅनर चर्चेचा विषय ठरला होता. आज एमआयडीसीतील रस्त्यांचे भूमीपूजन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितत पार पडले.
भाषणावेळी शिंदेंकडून पाटलांना चिमटा
कार्यक्रमावेळी भाषणात एकनाथ शिंदे यांनी मनसे आमदारांना चिमटा काढला. काम होणार आता बॅनर लावला पाहिजे. आम्ही भूमीपूजन केल्यावर माझी सवय आहे. त्याठिकाणी सर्व सामग्री साहित्य सोबत असते. खासदार श्रीकांत शिंदे हे एक पाऊल पुढे आहेत. त्यांनी जेसीबी पण आणून ठेवली आहे. आपण लोकांना बांधिल आहोत. यामध्ये राजकारण करायचे नाही. पक्षभेद मतभेद विसरून विकास कामे करायचे, असे एकनाथ शिंदे पुढे म्हणाले. (Eknath Shinde scolds Raju Patil over development of Dombivali MIDC roads)
इतर बातम्या
दगडफेकप्रकरणी तिघा आदिवासींना अटक, आम्हालाही अटक करा म्हणत आदिवासींनी पोलीस स्टेशनबाहेरच धरला ठेका