कल्याण लोकसभेत तब्बल ‘इतके’ मतदार वाढले, निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची माहिती

कल्याण लोकसभा निवडणुकीचे मतदान २० मे रोजी असून त्या मतदानाला सुमारे २० लाख १८ हजार९५८ मतदारांना त्यांचा हक्क बजावता येणार आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी असे मिळून सुमारे १३ हजार कर्मचारी या लोकसभा क्षेत्रात निवडणूक विषयात कार्यरत असतील.

कल्याण लोकसभेत तब्बल 'इतके' मतदार वाढले, निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची माहिती
कसे शोधणार मतदार यादीत नाव
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 7:55 PM

कल्याण | 19 मार्च 2024 : २०१९ मध्ये संपन्न झालेल्या निवडणूकीपेक्षा कल्याण लोकसभा क्षेत्रात ५३ हजार २८२ मतदारांची भर पडली असून या लोकसभेमध्ये २२ हजार १७९ युवा मतदारांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. १० लाख ८५ हजार ७१० पुरुष मतदार, ९ लाख ३२ हजार ५१० महिला, ७३८ इतर अशी मतदारांची विभागणी आहे. ५६५ सैनिक, १८ वर्षे पूर्ण केलेले २२ हजार १७९, २० ते २९ वयोगटातले ३ लाख ११ हजार ६९४, दिव्यांग १० हजार ८०२, पंच्याईंशी पेक्षा जास्त वय असलेले १८ हजार १७९ मतदारांचा त्यात समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

कल्याण लोकसभा क्षेत्रात 1955 मतदान केंद्र आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्या बरोबरच मतदानाचे टक्केवारी वाढावी यासाठी नागरिकांनी मतदानासाठी यावे असे आवाहन सातपुते यांनी केले. मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात 45 टक्के इतके कमी मतदान झाले होते. त्यामुळे 75 टक्के मतदान होणे आयोगाला अपेक्षित आहे. टक्केवारी वाढावी यासाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम :

  • निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक-२६ एप्रिल, २०२४ (शुक्रवार)
  • नाम निर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक-०३ मे, २०२४ (शुक्रवार)
  • नाम निर्देशन पत्रांची छाननी-०४ मे, २०२४ (शनिवार)
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक-०६ मे, २०२४ (सोमवार)
  • मतदानाचा दिनांक-२० मे, २०२४ (सोमवार)
  • मतमोजणीचा दिनांक-०४ जून, २०२४ (मंगळवार)

सरकारी अधिकारी, कर्मचारी असे मिळून सुमारे १३ हजार कर्मचारी या लोकसभा क्षेत्रात निवडणूक विषयात कार्यरत असतील. चोवीस तास फ्लाईंग स्कॉड कार्यरत असणार आहे. १९५० या नंबरवर डायल करून मतदार आपले मतदार यादीतले नाव नक्की करू शकतात असेही सांगण्यात आले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.