पाऊस सुरू होण्याआधीच अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली, मोठा अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?

आज रविवार असल्याने सरकारी आणि अनेक खासगी कार्यालये बंद आहेत. त्यामुळे चाकरमानी आज घरीच होते. वर्किंग डेच्या दिवशी जर ही घटना घडली असती तर चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असते.

पाऊस सुरू होण्याआधीच अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली, मोठा अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
mumbai localImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 10:49 AM

अंबरनाथ : अजून म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक सरी पडत आहेत. अवघे काही मिनिटं तुरळ सरी पडतात आणि पाऊस गायब होतो. पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. तुरळक सरी पडत असल्याने कुठेही पाणी तुंबलेले नाही. असं असतानाही पाऊस सुरू होण्याआधीच मध्यरेल्वेची हाराकिरी सुरू झाली आहे. आज अंबरनाथ येथे लोकल रेल्वे रुळावरून घसरली आहे. सुदैवाने ही लोकल संपूर्ण खाली होती. शिवाय मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने लोकल सेवाही कमी करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळी 8.25 वाजता ही लोकल घसरली. ही लोकल रिकामी होती. लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. त्यामुळे कर्जतहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आज मेगा ब्लॉक असल्याने रेल्वे गाड्यात कपात करण्यात आली आहे. तसेच ही लोकलही रिकामी होती. त्यामुळे मोठा अनर्थ ओढवला नाही. रेल्वे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचं काम सुरू केलं आहे.

हे सुद्धा वाचा

तर चाकरमान्यांचे हाल झाले असते

दरम्यान, आज रविवार असल्याने सरकारी आणि अनेक खासगी कार्यालये बंद आहेत. त्यामुळे चाकरमानी आज घरीच होते. वर्किंग डेच्या दिवशी जर ही घटना घडली असती तर चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असते. आज जरी चाकरमानी घरी असले तरी अनेक लोक मुंबई किंवा कर्जतला जात असतात. त्यांना मात्र याचा फटका बसला आहे. रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पाऊस नसतानाही हाराकिरी

दरम्यान, पाऊस सुरू झाल्यावर रेल्वेला पहिल्या पावसाचा फटका बसतो. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे बंद पडत असते. मात्र, अजून पाऊस सुरूही झाला नाही तोच रेल्वे रुळावरून घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आताच रेल्वेची ही अवस्था आहे तर पाऊस सुरू झाल्यानंतर काय पाहावं लागेल अशा प्रतिक्रिया प्रवासांमधून उमटत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.