TMC: महापालिका आयुक्तांचे नावे बोगस क्रमांकावरून अधिकारी, नगरसेवकांना कॉल, एसएमएस; मागणी काय?

TMC: आयुक्त विपिन शर्मा यांच्या नावाने बोगस क्रमांकावरून फोन करून पैशाची मागणी करण्यात येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

TMC: महापालिका आयुक्तांचे नावे बोगस क्रमांकावरून अधिकारी, नगरसेवकांना कॉल, एसएमएस; मागणी काय?
महापालिका आयुक्तांचे नावे बोगस क्रमांकावरून अधिकारी, नगरसेवकांना कॉल, एसएमएस; मागणी काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 3:20 PM

ठाणे: ठाणे महानगरपालिका (tmc) आयुक्त डॉ. विपिन शर्मा (vipin sharma) यांच्या नावाने +91 81672 83910 या बोगस संपर्क क्रमांकावरून अधिकारी व नगरसेवकांना कॉल व एसएमएस करण्यात येत आहेत. काही पैशाची मागणी देखील करण्यात येत आहे. तरी या बोगस संपर्क क्रमांकास प्रतिसाद न देता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे. ठाणे (thane) महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून बोगस क्रमांकावरून हे फोन करण्यात येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या नंबरवरून व्हाट्सएप खाते देखील उघडण्यात आले असून यावर महापालिका आयुक्तांचा फोटो लावण्यात आला आहे. या क्रमांकावरून काही पैशाची मागणी देखील करण्यात येत आहे. सदरचा क्रमांक बोगस असून याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या नावाने बोगस क्रमांकावरून फोन करून पैशाची मागणी करण्यात येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी स्वत: या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यावर तातडीने खुलासा केला आहे. बोगस संपर्क क्रमांकास नागरिकांनी प्रतिसाद न देता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन आयुक्त शर्मा यांनी केले आहे.

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी

दरम्यान, ठाणे शहरातील वर्तकनगर प्रभाग समितीमधील विविध ठिकाणाच्या स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती, गटर्स कामांची आज महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी परिसर स्वच्छतेसोबत रंगरंगोटी, उद्यानाची डागडुजी व रस्त्यांवरील डेब्रिज तात्काळ हटविण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी सी.डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र इमारतीची रंगरंगोटी करणे, ओपन जीम, उद्यान विकास तसेच बेंचेस व विद्युत व्यवस्था करणे, भिमनगर रस्त्यामधील दुभाजकांमध्ये झाडे लावणे ग्रील पेंटींग , रामदास गजानन उद्यान दिनांक 15 मे 2022 रोजी नागरीकांसाठी खुले करणे, विनायक उद्यानात थिम पेंटींग करणे, खेळणी दुरुस्ती करणे व रबर फ्लोरींग बसविणे, जुन्या म्हाडा इमारतींजवळील रॅबिट व कचरा उचलणे तसेच इमारत क्र. 55, 56 व 57 या पुनर्वसन इमारतीचे कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

अधिकाऱ्यांना निर्देश

तसेच या परिसरातील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, ब्राम्हण विद्यालयामधील धोकादायक झाडे तसेच पडलेल्या भिंतीचे रॅबिट उचलणे, आनंदीबाई हॉस्पिटलच्या धोकादायक इमारतीचा भार कमी करणे, शाळा क्र. 44 मध्ये किरकोळ दुरुस्ती करून ड्रेनेज व गळतीची कामे वेळेत करून घेणे, यासोबतच टीएमटी बस चालकांकरीता विश्रांती कक्ष खाजगी विकासकांच्या माध्यमातून बनविणे, चिरागनगर नाला कलव्हर्ट रुंदीकरणाचे काम टप्प्या टप्प्यात पूर्ण करुन घेणे आदी निर्देशही देण्यात आले. तसेच टीसीएस वॉल कंपाऊंडची रंगरंगोटी करणे, विवियाना मॉल मागील रस्त्याचे पुर्नर्पुष्टीकरण करणे, पाण्याचा वॉल बंदिस्त करणे आणि रस्त्याचे कडेला पडलेला मोठा दगड उचलणे , पोखरण रोड नं. 2 व्होल्टास कंपनीचे समोर दुभाजक व विद्युत पोलचे कामकाज करणे, व्होल्टास कंपनी समोरील ब्रिजच्या कडेला रॅबिट व बेवारस रिक्षा तात्काळ हटविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी साईनाथ नगर, भिमनगर परिसरातील बीएमसी पाईपलाईन लगतचा खचलेला भाग पुर्नर्पुष्टीकरण करणेकरीता बीएमसीशी सनियंत्रण करणे, भिमनगर येथील धोकादायक शौचालय, जानका देवी पाईपलाईन समोरील धोकादायक शौचालय त्वरीत निष्कासित करुन नविन बांधकाम करणे, तसेच या परिसरातील सार्वजनिक मोकळे मैदानात साफ सफाई करण्याचे निर्देशही संबधितांना दिले

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.