Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | कल्याणमध्ये परंपरेच्या नावाखाली बैलांसोबत जीवघेणा खेळ, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

एका ठिकाणी गवत पेटवून तर दुसऱ्या ठिकाणी फटाके फोडून त्यावरुन बैल उडविले जात आहेत. इतकेच नाही तर त्या आगीवरुन माणसेही उड्या मारताना दिसत आहेत.

VIDEO | कल्याणमध्ये परंपरेच्या नावाखाली बैलांसोबत जीवघेणा खेळ, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
crime
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 6:08 PM

कल्याण : प्राण्यांसंबंधित खेळांवर बंदी असतानाही अशा प्रकारचे खेळ सर्रासपणे आयोजित केले जात असल्याचे पहायला मिळते. कल्याणमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. आगीवर बैल उडविण्याच्या कार्यक्रमाचे कल्याणमधील दोन ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे तसेच चंद्रपूर शहरात रेड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

बंदी असतानाही आगीवर बैल उडवले

कल्याण डोंबिवलीत आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात बैलांची शर्यत आयोजित केली जात होती. सुप्रीम कोर्टाने या शर्यतीवर बंदी आणली. तरी देखील अनेक ठिकाणी नियम डावलून या शर्यती आयोजित केल्या जातात. कोरोना काळात सुद्धा या शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. बैलांची शर्यत सुरु व्हावी यासाठी विविध संघटनांनी मागणी केली अहे. त्याला प्राणी मित्र संघटनांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये दोन धक्कादायक घटनांचा व्हिडिओ समोर आला आहे. एका ठिकाणी गवत पेटवून तर दुसऱ्या ठिकाणी फटाके फोडून त्यावरुन बैल उडविले जात आहेत. इतकेच नाही तर त्या आगीवरुन माणसेही उड्या मारताना दिसत आहेत.

कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरु

एक व्हिडिओ कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसराचा आहे. दुसरा व्हिडिओ कल्याण ग्रामीणमधील एका गावातील असल्याचा समोर आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कल्याण वॉर रेस्क्यू फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सुभाष पवार या प्राणी मित्रने अशा प्रकारच्या आयोजकांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. टीव्ही 9 ने ही बातमी दाखविताच कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलीस काय कारवाई करतात. याकडे लक्ष लागले आहे. परंपरेच्या नावाखाली जनावरे आणि माणसाचा जीव धोक्यात घालणाऱ्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Fatal game with animals in the name of tradition in Kalyan, video goes viral on social media)

इतर बातम्या

जांभळाच्या झाडाला तरुणाचा गळफास, शेजारी रिकामा फास, ऐनवेळी कोणी माघार घेतली?

बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना नाशिकमध्ये बेड्या; संशयितामध्ये दोघे अल्पवयीन

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.