गुटखा विकण्यावरून धावत्या एक्सप्रेसमध्ये फेरीवाल्यांमध्ये हाणामारी, धारदार शस्त्राने वार; एक गंभीर जखमी
गुटखा विकण्याच्या वादावरून धावत्या एक्सप्रेसमध्ये दोन फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (fight between two hawkers, one severely injured)

कल्याण: गुटखा विकण्याच्या वादावरून धावत्या एक्सप्रेसमध्ये दोन फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीत एका फेरीवल्याने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने हा फेरीवाला जखमी झाला आहे. याप्रकरणी कल्याण आरपीएफ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, फेरीवाले सर्रासपणे गुटखा विकत असताना आरपीएफ पोलीस करतात काय? असा सवाल केला जात आहे.
चालत्या ट्रेनमध्ये गुटखा विकण्याच्या वादातून फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन गुटका विक्रेत्यांनी एका फेरीवाल्यावर धारदार शस्त्रने हल्ला केला. यात पवन गुप्ता नावाचा फेरीवाला जखमी झाला आहे.. तर हल्लेखोर दोन फेरीवाल्यांना कल्याण आरपीएफ पोलिसांनी अटक केली आहे. ट्रेनमध्ये सर्रासपणे फेरीवाले धंदा करतात. फेरीवाले फिरून गुटखा विकत आहेत. आरपीएफ करते काय? या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सध्या ट्रेनमध्ये लस घेतल्याशिवाय प्रवास करु शकत नाही. अशा परिस्थितीत सर्रासपणे गुटखा विक्रेत्यांना कसा काय प्रवेश मिळतो. फेरीवाले धारदार शस्त्रे घेऊन फिरतात. एकमेकांवर जीवघेणा हल्ला करतात. याचा त्रास प्रवाशांना होतो. याची जबाबदारी आरपीएफची आहे. ट्रेनमध्ये फेरीवाले आरपीएफच्या मिलीभगत शिवाय जाऊ शकत नाही. या प्रकरणाचा रितसर तपास झाला पाहिजे. दोषींच्या विारेधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
रेल्वे स्थानकात गर्दुल्ल्यांची तुफान हाणामारी
दरम्यान, मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात दोन गर्दुल्ल्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कसारा रेल्वे स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये स्थानकात उभी होती. तेव्हाच या दोन्ही गर्दुल्ल्यांमध्ये हाणामारी सुरु झाली. त्यावेळी एकाने स्वत:जवळ असलेल्या ब्लेडने दुसऱ्यावर वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या गर्दुल्ल्याची ओळख पटली असून त्याचे नाव सोनू असे आहे. सोनूच्या गळ्यावर आणि छातीवर ब्लेडचे वार झाले आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.
पाकीट पळवणाऱ्या चोरट्याकडून तरुणाची हत्या
विरारमध्ये चोरट्याने 30 वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. पाकीट हिसकावून पळणाऱ्या चोराचा पाठलाग करुन पकडले असता चोरट्याने त्याच्यावर वार केले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात जबरी चोरी, हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. हत्या करणारा चोरटा हा सराईत असून त्याच्यावर रेल्वेत चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
30 वर्षीय हर्षल वैद्य विलेपार्ले भागात राहणारा असून नवरात्री निमित्त तो विरारमध्ये आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तो परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेला, तेव्हा एका सराईत चोरट्याने त्याचं पाकीट हिसकावून पळ काढला. हर्षलने चोरट्याचा पाठलाग करुन विरार पश्चिम स्टेशन जवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडले. यावेळी चोर आणि हर्षल वैद्य यांच्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने आपल्याजवळील धारदार हत्याराने हर्षलच्या छातीत वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी तात्काळ त्याला बाजूच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले, तर चोरट्यालाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विरार पोलिसांनी यात हत्या, जबरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 October 2021 https://t.co/USApX9K4fX #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
संबंधित बातम्या:
पतीचे दुसर्या महिलेशी प्रेमसंबंध, पत्नीला राग अनावर; आधी गोळी मारली मग शरीराचे केले तुकडे
अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचा बलात्कार, आता आई म्हणते माझ्यासोबतही अपहरण करुन लग्न
(fight between two hawkers, one severely injured)