डोंबिवली एमआयडीसीत कंपनीला भीषण आग, सहा कोटींचा माल जळून खाक
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे (Fire breaks out at Dombivli MIDC company).
ठाणे : डोंबिवली पूर्वेतील खंबालपाडा परिसरात असलेल्या शक्ती प्रोसेस कपडा कंपनीला संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निमशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे (Fire breaks out at Dombivli MIDC company).
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आग विजवत असताना अग्निशमन दलाचे कर्मचारी सुभाष भोर हे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या आगीत जवळपास सहा कोटी रुपयांचा कपड्यांचा माल जळून खाक झाला आहे, अशी माहिती मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.
डोंबिवली एमआयडी परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. या घटना शुक्रवारीच का घडतात? असा प्रश्न राजेश कदम यांनी उपस्थित केला. “शुक्रवार आणि एमडीसीत आग हे जणू काही समीकरणच झालं आहे. शुक्रवारी एमआयडीसी परिसर बंद असतो. अशावेळीच आग का लागते? आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंपनीचा सहा कोटींचा माल जळून खाक झाला आहे. यामागे रहस्य काय? तुम्ही एवढा माल ठेवतात मग खबरदारी का घेत नाहीत? या आगी शुक्रवारीच का लागतात, यामागे गौडबंगाल काय? हे समोर यायला हवं”, असं राजेश कदम म्हणाले.
काही दिवसांपूर्वी सोनारपाडा परिसरात एका गोदामाला आग लागली होती. डोंबिवलीत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बेकायदा भंगार गोदाम आणि केमिकल कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून काही ठोस कारवाई होताना दिसत नाही (Fire breaks out at Dombivli MIDC company).
हेही वाचा : फॅक्ट चेक : राज्य सरकारच्या सरल पोर्टलवर फक्त ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद?