ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने ‘पंचरत्नां’चा सन्मान

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल शहापूरमधील उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. तर इमारत पडण्यापूर्वी 135 लोकांचा जीव वाचवल्याप्रकरणी उल्हासनगर अग्नीशमन दलातील 4 कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने 'पंचरत्नां'चा सन्मान
ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने 'पंचरत्नां'चा सन्मान
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 5:14 PM

ठाणे सुनील घरत/निनाद करमरकर : यंदाच्या राष्ट्रपती शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात ठाणे जिल्ह्यातील पाच जण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला हा सन्मान होणार आहे. शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील 4 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 25 पुरस्कार विजेत्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल शहापूरमधील उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. तर इमारत पडण्यापूर्वी 135 लोकांचा जीव वाचवल्याप्रकरणी उल्हासनगर अग्नीशमन दलातील 4 कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. (Five civil servicemen from Thane honoured with President’s Bravery Award)

कोण आहेत नवनाथ ढवळे?

नवनाथ ढवळे 2015-2017 या काळात गडचिरोली जिल्हा पोलीस दल ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2016 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात नवनाथ ढवळे यांनी त्यांच्या टीमने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी आणि तिच्या सोबत सहा वरीष्ठ नक्षलींचा खात्मा केला. ही चकमक तब्बल 12 तास सुरु होती. ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.

मूळ अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे या गावातील असलेल्या नवनाथ ढवळे यांनी गडचिरोली, कराड, चिपळूण याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून काम करत आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले कामही लक्ष्यवेधी ठरले आहे.

उल्हासनगरच्या 4 अग्निशमन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

उल्हासनगर शहरातील मेहक अपार्टमेंट या इमारतीला 2019 साली तडे जाऊन ही इमारत एका बाजूला कलली होती. या इमारतीतून अग्निशमन दलाने 134 रहिवाशांना बाहेर काढलं आणि त्यानंतर काही क्षणातच ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या कामगिरीसह उल्हासनगर शहरात अनेकदा घडलेल्या इमारत कोसळण्याच्या दुर्घटना, त्यामध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने केलेलं रेस्क्यू ऑपरेशन, या सगळ्याची दखल घेत उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलातील चार कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सहाय्यक स्टेशन ऑफिसर बाळासाहेब नेटके यांच्यासह फायरमन पंकज पवार, संदीप आसेकर आणि राजेंद्र राजम या चौघांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारासाठी देशातून सिविल सर्विसेसमधील 25 जणांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातले 8, तर उल्हासनगरचे चौघे आहेत. त्यामुळे उल्हासनगर शहरात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. हा पुरस्कार म्हणजे आमच्या आजवरच्या मेहनतीचं चीज असून त्याचं वर्णन शब्दात करता येण्यासारखं नसल्याची प्रतिक्रिया सहाय्यक स्टेशन ऑफिसर बाळासाहेब नेटके यांनी व्यक्त केली. यावेळी प्रतिक्रिया देताना बाळासाहेब नेटके यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. या पुरस्कारानंतर उल्हासनगर शहरातून अग्निशमन दलाच्या या चार जाबाँज कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. (Five civil servicemen from Thane honoured with President’s Bravery Award)

इतर बातम्या

फेस्टिव्हल ऑफर! Yamaha च्या गाड्यांवर बंपर डिस्काऊंट, हजारोंची बचत करण्याची संधी

युवासेनेच्या संवाद मेळाव्यात गर्दी जमवणे भोवले, औरंगाबादेत आयोजकांवर गुन्हा दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.