Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Drowned Death : डोंबिवलीत खदाणीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

संदप गावातील मीरा गायकवाड आणि अपेक्षा गायकवाड या दोघी दुपारी 4 च्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत अपेक्षा यांची तीन मुलेही होती. आई आणि आजी कपडे धुत असताना मुलं खदानीच्या काठावर खेळत होती. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने मुलं पाण्यात पडली.

Dombivali Drowned Death : डोंबिवलीत खदाणीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
डोंबिवलीत खदाणीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:38 PM

डोंबिवली : कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेलेल्या एका कुटुंबातील पाच जणांचा बुडून (Drowned) दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना डोंबिवलीतील संदप गावात घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. मुलं पाण्यात पडल्यामुळे आई आणि आजीने त्यांना वाचवण्यासाठी उड्या मारल्या. मात्र यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.य अपेक्षा गायकवाड (30), मीरा गायकवाड (55), मयुरेश गायकवाड (15), मोक्ष गायकवाड (13), निलेश गायकवाड (15) अशी मयतांची नावे आहेत. अग्नीशमन दलाच्या मदतीने पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबासह संदप गावात शोककळा पसरली आहे. (Five members of the same family drown in a mine in Dombivali)

पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

संदप गावातील मीरा गायकवाड आणि अपेक्षा गायकवाड या दोघी दुपारी 4 च्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत अपेक्षा यांची तीन मुलेही होती. आई आणि आजी कपडे धुत असताना मुलं खदानीच्या काठावर खेळत होती. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने मुलं पाण्यात पडली. त्यांना वाचवण्यासाठी आधी आईने आणि नंतर आजीने पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि दोघींनाही पोहता येत नसल्याने पाचही जण पाण्यात बुडून मरण पावले. घटनेची माहिती कळताच तात्काळ अग्नीशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Five members of the same family drown in a mine in Dombivali)

हे सुद्धा वाचा

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.